जुन्नरला शाळेत एक पुस्तक एक वही उपक्रम

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

जुन्नर (पुणे) : पुणे जिल्हा परिषदेचा एक पुस्तक एक वही दप्तराचे ओझे नाही उपक्रम एक फेब्रुवारी पासून ओतूर व बेल्हे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक मध्ये सुरू करण्यात आला आहे.

जुन्नर (पुणे) : पुणे जिल्हा परिषदेचा एक पुस्तक एक वही दप्तराचे ओझे नाही उपक्रम एक फेब्रुवारी पासून ओतूर व बेल्हे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक मध्ये सुरू करण्यात आला आहे.

पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ यांनी ही माहिती दिली. ओतूर येथील इयत्ता चौथीची 69 व बेल्हे मधील 52 विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले आहेत. प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम फेब्रुवारी महिन्यात राबविण्यात येणार असून पालक,शिक्षक,विद्यार्थी तसेच मान्यवरांच्या प्रतिक्रिया घेण्यात येणार आहेत. विद्यार्थी व पालकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू असून एका महिन्यात शिकविण्याचे घटकांचा एका स्वतंत्र पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. अशा प्रकारचे पुस्तक दर महिन्यात दिले जाणार असून यामुळे दप्तराचे ओझे कमी होण्यास मदत होणार आहे. 

Web Title: Marathi news pune news school book pen activity