बारामतीतील पारवडीच्या गावडे विद्यालयात विज्ञान प्रदर्शन 

Science-Exhibition
Science-Exhibition

शिर्सुफळ (पुणे) : विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीला चालना मिळण्यासाठी वैज्ञानिक प्रकल्पांच्या प्रदर्शनासारख्या उपक्रमाची आवश्यकता असते. अशा उपक्रमाच्या माध्यमातुनच भविष्यातील विविध क्षेत्रातील शास्त्रज्ञ घडत असतात, असे प्रतिपादन प्राचार्य सखाराम गावडे यांनी केले.

पारवडी (ता.बारामती) येथील कै.जिजाबाई दादासाहेब गावडे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे अगस्त्य फाऊंडेशन व पारवडी विद्यालय  यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटन प्रसंगी गावडे बोलत होते. या प्रदर्शनात एकूण 160 प्रकल्प ठेवण्यात आले. यांची माहिती विद्यालयासह परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी घेतली. 

या कार्यकमाला विद्यालयाचे पर्यवेक्षक दिलिप पवार, पियाजो कंपनीचे कुणाल सावंत, दादासो भिसे त्यांचे सहकारी उपस्थित होते. हे प्रदर्शन पार पाडण्यासाठी विद्यालयातील विज्ञान शिक्षक दत्तात्रय फडतरे, दादा बारगुजे, रमेश काशिद ,अर्चना ठोंबरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com