शिवाजी महाराजांनी बंधुता जोपासून स्वराज्याची निर्मिती केली

shreepal sabnis
shreepal sabnis

नवी सांगवी - " शिवाजी महाराजांचे हिंदुत्व हे संकुचित नाही तर व्यापक होते, त्यामुळेच त्यांच्या सैन्यात विजापुरचे पठाण, इब्राहिम खान यांच्यासारखी मुस्लिम माणसे होती. त्याकाळची वर्ण व्यवस्था विषम असली तरी शिवाजी राजांनी अठरा पगड जातीच्या माणसांशी बंधुता जोपासून स्वराज्याची निर्मिती केली. " असे उद्गार साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी येथे काढले. राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि सुरून इंफोकोअर सिस्टिम यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीचे औचित्य साधुन सुरू झालेल्या बंधुता डॉट कॉम या संकेत स्थळाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी त्यांनी आपले विचार मांडले.

यावेळी प्रकाश रोकडे, डॉ अशोककुमार पगारिया, प्रकाश जवळकर, सुनिल यादव, महेंद्र भारती, विवेक इनामदार उपस्थित होते. यावेळी डॉ भीम गायकवाड, चंद्रकांत वानखेडे, संगिता झिंजुरके यांनी काव्यगीत सादर केली. तर नियोजित पाचव्या विद्यार्थी व शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष चंद्रकांत वानखेडे यांचा गौरव करण्यात आला. 

सबनीस म्हणाले, " शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीची संकल्पना शहाजीराजे व जिजाऊ यांच्याशी केलेल्या संवादातून तडीस नेली. त्याकाळच्या वेशीबाहेरच्या माणसांनीही पालखी वाहणे, घोड्याला चंदी देणे यासारखी कामे निष्ठेने केली. त्यामुळे हे स्वराज्य महाराजांनी बंधुतेच्या पायावर उभे केले. आणि स्वराज्याच्या विरोधात उभे राहणाऱ्यांशी दोन हात केले. "

स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही लोकशाहीची मुल्य असली तरी बंधुता ही संकल्पना अद्यापही कोपऱ्यात बसली आहे. बंधुतेच्या अभावामुळेच कम्युनिझम आणि आंबेडकरी चळवळीचे तुकडे झाले. बंधुत्वाच्या तत्वाला निर्णायक महत्व, तसेच आचरणात न आणल्याने भिमा कोरेगाव सारख्या घटना घडल्या. तरूण पिढीला बंधुता शिकवायला आपण कमी पडत असल्याने बलात्कारासारख्या घटना घडतात. या श्रीपाल सबनिसांच्या विचारांना उपस्थितांनी सहमती दर्शविली. 

शंकर आथरे यांनी सुत्रसंचलन केले तर सर्वेश सोनवणे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com