पुण्यात शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक (व्हिडिओ)

Shivaji Maharaj
Shivaji Maharaj

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज (ता. 19) शहराच्या मध्यवर्ती भागातून मुख्य मिरवणुकीसह विविध संस्था, संघटनांकडून मिरवणूक काढण्यात आली. 

ढोलपथक, चित्तथरारक कसरती, तुतारी वादक यामुळे वातावरण जल्लोषमय झाले होते. शिवाजी महाराजांना अभिवादन करून या मिरवणुकीला सकाळी सुरवात झाली. शिवाजी महाराजांची पुतळा असलेल्या भव्य रथासह विविध संस्था व संघटनांकडून मिरवणूक सहभाग घेण्यात आला होता. मिरवणुकीमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात आला असून, पर्यायी रस्त्यावरून वाहतूक वळविण्यात आली होती.

वाहतुकीचे नियोजन पुढीलप्रमाणे :
बंद रस्ते पर्यायी रस्ते 
* भवानी माता मंदिर ते रामोशी गेट, जुना मोटार स्टॅंड - कासेवाडी रस्ता 

* जुना मोटार स्टॅंड ते पद्‌मजी चौक, क्वार्टर गेट - क्वॉर्टर गेट ते संत कबीर चौक 

* नेहरू रोड, ए. डी. कॅम्प चौक, रामोशी गेट चौक ते संत कबीर चौक - रामोशी गेट ते जुना मोटार स्टॅंड किंवा कासेवाडी रस्ता 

* लक्ष्मी रस्त्यावरील संत कबीर चौक ते सोन्या मारुती चौक - रास्ता पेठ पॉवर हाउस ते अपोलो चित्रपटगृह 
- नेहरू रस्ता किंवा क्वॉर्टर गेट ते पद्‌मजी चौक, जुना मोटार स्टॅंड 

* हमजेखान चौक ते देवजीबाबा चौक - दारूवाला पूल ते नाना पेठ 

* सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक - सुभानशहा दर्ग्याकडून पूर्वेस 
----------------------------- 
* बुधवार चौक ते मोती चौक - बुधवार चौक ते बेलबाग चौक, दत्त मंदिर, गोटीराम भैया चौकातून पूर्वेस 

* देवजीबाबा चौक ते फडके हौद चौक - योजना हॉटेल चौक ते पवळे चौक 

* गाडगीळ पुतळा ते जिजामाता चौक - कुंभारवेस 

* गाडगीळ पुतळा ते शिवाजी महाराज पुतळा - स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने 
- संचेती चौक, कामगार पुतळा, शाहीर अमर शेख चौक ते मालधक्का 
- अप्पा बळवंत चौक, केळकर रस्त्यावरून टिळक चौकाकडे 

* पूरम चौक ते गाडगीळ पुतळा चौक - टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता व केळकर रस्ता 
--------------------------- 
* स. गो. बर्वे चौक - सुभाषचंद्र बोस चौक (संचेती रुग्णालय) जंगली महाराज रस्ता, 
झाशीराणी चौकातून इच्छितस्थळी 

* खुडे चौक - खुडे चौक, जंगली महाराजा रस्ता, झाशीची राणी चौकातून पुढे 

* साठे चौक - कुंभारवेसकडून येणारी वाहतूक महापालिका भवनाकडे सोडण्यात येईल 

* कामगार पुतळा चौक - कामगार पुतळा चौकाकडून येणारी वाहतूक लॉर्ड वेलस्ली पुलावरून 
शाहीर अमर शेख चौकाकडे सोडण्यात येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com