शिवचरित्र समाजात रुजविणे गरजेचे - प्रा. कदम

Prof.Kadam
Prof.Kadam

उंडवडी (पुणे) : ''मोहा पायी जगात स्वप्न भंगली तरी श्वासांनो मातीशी बेमान होवू नका, शिवरायांचे चरित्र आम्हाला शिकवून गेलंय. त्याचा विचार समाजात रुजविणे गरजेचे आहे. तरुण पिढी मोबाईल आणि सोशल मिडीयामुळे बिघडत चाललीय. आपल्या मुलांना वाढदिवसाला भारी किमंती मोबाईल फोन, भेट देण्यापेक्षा शिवचरित्र भेट द्या. म्हणजे आजची पिढी शिवचरित्र वाचून सक्षम व सुसंस्कृत होण्यास मदत होईल. '' असे मत व्याख्याते प्राध्यापक राजकुमार कदम यांनी सोनवडी सुपे येथे व्यक्त केले. 

सोनवडी सुपे (ता. बारामती. जि पुणे) येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्त आयोजित केलेल्या 'शिवचरित्र' व्याख्यान कार्यक्रमात प्राध्यापक राजकुमार कदम बोलत होते. यावेळी सरपंच मंदा मोरे, उपसरपंच भाउसाहेब मोरे, पोलीस पाटील विद्या वावगे, माजी सरपंच सविता मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलचे तालुकाध्यक्ष सुहास काळे, भारतीय जनता पार्टीचे माजी उपाध्यक्ष प्रकाश मोरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

प्रा. कदम पुढे म्हणाले, "समाजात अनेकजण शेतातील बांधावरून फुटा-फुटासाठी भांडत असतात. तर दुसरीकडे अर्धा एकर जमीन पडीक ठेवतात. अशी वृत्ती वाढत चाललीय, यामुळे दोन्ही कुटुंबाचा पैसा आणि वेळ वायाला जावून पिढी बरबाद होते. ही गंभीर बाब आहे. जिजाऊची शिवबाला चांगली शिकवण होती, म्हणून राजेशिवाजी घडले. जो पर्यंत शत्रू स्वराज्यावर चाल करत होते. तो पर्यंतच राजे शिवाजीमहाराजांचे दुश्मन होते, मात्र त्याना ठार केल्यानंतर त्यांचे शीर प्रतापगडच्या पायथ्याशी अफलजल खानाच्या कबरीवर दिवा मातीची सोय केली आहे. ही शिकवण आजच्या जिजाउने आपल्या शिवबाला दिली पाहिजे. म्हणजे बदल्याची मनातील वाईट भावना संपून चांगली पिढी घडेल.'' 

यावेळी प्रियंका मोरे, पूजा मोरे यांनी शिवचरित्रावर मनोगते व्यक्त केली. दरम्यान, शिवजयंती उत्सवासाठी बालचिमुकल्यानी शिवजोत जळगाव सुपे येथील दत्त मंदीरातून आणली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ मोरे तर आभार प्रविण गायकवाड यांनी मानले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com