पुणे जिल्हायातील तरुणांनी राजस्थानात केली शिवजंयती साजरी 

Rajsthan
Rajsthan

पारगाव (पुणे) : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील तरुणांकडुन राजस्थानमध्ये स्थानिक नागरिकांना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन शिवजंयती साजरी केली. देशातल्या कोणत्याही राज्यात असलो तरी छत्रपतींची जयंती आम्ही उत्साहात साजरी करतो हे दाखवून दिले आहे.

आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील व्यावसायिक संदिप निकम, राजाराम बोऱ्हाडे व धामणीचे माजी उपसरपंच निलेश रोडे हे मंचर येथे मार्बल (संगमरवर) चा व्यवसाय करणारे गणेश राम चौधरी यांच्या कुटुंबातील विवाह समारंभासाठी चौधरी यांचे मुळ गाव असलेल्या राजस्थान राज्यातील पदमपुरा (ता. कुचामन सिटी) जि. नागौर या ठिकाणी दोन दिवसापुर्वी गेले आहेत. 

आज शिवजयंती असल्याने त्यांनी बाजारातुन शिवाजी महाराज यांची प्रतिमा खरेदी करुन फुलांचा हार घालुन स्थानिक सरपंच नरसी चौधरी यांच्या हस्ते प्रतीमेचे पुजन केले यावेळी शिवकरण चौधरी व स्थानिक नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी संदिप निकम यांनी तेथील स्थानिक शालेय विद्यार्थांना शिवाजीमहारांचे चरित्र सांगीतले व आम्ही शिवाजीमहाराजांचा जन्म ज्या शिवनेरी किल्ल्यावर झाला त्याच परिसरातील आम्ही सर्वजण राहत असल्याचे अभिमानाने सांगीतले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com