दोन दिवसात शिवनेरीला दोन लाख शिवप्रेमींची भेट

Junnar
Junnar

जुन्नर (पुणे) : छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीच्या शिवजन्म भूमीला शिवजयंतीच्या निमित्ताने 18 व 19 फेब्रुवारीला दोन दिवसात दोन लाख शिवभक्तांनी वंदन केले तर राज्याच्या विविध भागात हजारो शिवज्योति शिवप्रेमींनी शिवजन्म स्थानाहून प्रज्वलित करून नेल्या असल्याचे वनविभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

शिवजयंतीला गर्दीचा उच्चांक झाला होता. पहाटे पासून रात्री उशिरापर्यंत एक लाखाहून अधिक शिवप्रेमी आले होते तर बस, चारचाकी व दुचाकी वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. शिवनेरीच्या पायथ्याशी दोन किलोमीटर अंतरापर्यंत वाहने उभी होती. यावेळी गडावर प्लॅस्टिक बंदी प्रभावी पणे अंमलात आणल्याने प्लॅस्टिकची बाटली सुद्धा वन विभागाने वर जाणार नाही याची दक्षता घेतली त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. स्वच्छ व शुध्द पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. स्वच्छता,साफसफाई व देखरेख करण्यासाठी पन्नासहून अधिक कर्मचारी नियुक्त केले होते.

पुणे वृत्तचे मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, जुन्नरचे उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे, सहाय्यक वनसंरक्षक युवराज मोहिते, श्रीमंत गायकवाड, वनक्षेत्रपाल जयंत पिसाळ, सचिन रघतवान यांचे मार्गदर्शनाखाली जुन्नरचे वनपाल कृष्णा दिघे व कर्मचाऱ्यांनी शिवप्रेमींची गडावर गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली होती. शिवजयंतीला शिवकुंज वास्तूच्या मागील बाजूला असणाऱ्या वनविभागाच्या उद्यान क्रमांक चारमध्ये विश्वगुरू सन्मानित नामदेव महाराज हरड व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध प्रजातीच्या झाडांच्या रोपांची लागवड करून वृक्षारोपण केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com