उत्तर प्रदेशच्या मराठी समाज संघटनेच्या शिवज्योत रॅलीस शुभारंभ    

दत्ता म्हसकर
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

जुन्नर (पुणे) : शिवनेरी ते लखनऊ विश्वविद्यालय शिवज्योत रॅलीचा शुभारंभ आज मंगळवारी (ता.13) छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीहून करण्यात आला. 19 फेब्रुवारीला साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या निमित्ताने मराठी समाज उत्तर प्रदेश या संघटनेने रॅलीचे आयोजन केले असल्याचे संस्थापक अध्यक्ष उमेश पाटील यांनी सांगितले.

आज सकाळी शिवजन्मस्थानास वंदन करून शिवाई मातेचे दर्शन घेऊन शिवज्योत प्रज्वलित करण्यात आली. यावेळी संघटनेचे विश्वनाथ देवकर,पांडुरंग रावत, संतोष पाटील, गजानन माने, अप्पा चव्हाण, विश्वास पाटील, सुभाष वलेकर, कुमार मिश्रा आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जुन्नर येथे शिवजन्मभूमी संवर्धन समितीचे रवींद्र काजळे, दत्ता म्हसकर तसेच मराठा सेवा संघाचे सुनिल ढोबळे, शिवाजी डोंगरे, लालासाहेब निकम, सुनील तांबे, कुमार गाडेकर यांनी त्यांचे स्वागत केले. ही रॅली 1 हजार 600 किलोमीटरचा प्रवास करणार असून आळेफाटा, मालेगाव मार्गे मध्यप्रदेश व पुढे आग्रा लखनौ असा प्रवासाचा मार्ग आहे. यात 500 मोटार सायकलस्वार सहभागी असून महिलांनी देखील भाग घेतला आहे. 

Web Title: Marathi news pune news shivneri shivjyot rally