दौंड: गोवा एक्स्प्रेसमध्ये ३ लाख ९४ हजार रूपयांची चोरी

crime
crime

दौंड : गोवा एक्सप्रेस मधून १२ फेब्रुवारी रोजी प्रवास करणार्या ज्येष्ठ महिला प्रवाशाची पर्स चोरून ३ लाख ९४ हजार रूपयांचा एेवज लंपास करण्यात आला आहे. लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना अटक केली आहे. 

दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याचे हवालदार अनिल टेके यांनी शनिवारी (ता. १७) सायंकाळी या बाबत माहिती दिली. श्रीमती राधादेवी हनुमानदास सारडा (वय ७०, रा. सारडा गल्ली, नगर) या १२ फेब्रुवारी रोजी गोवा एक्सप्रेसने सांगली ते नगर असा वातानुकूलित डब्ब्यातून प्रवास करीत होत्या. गोवा एक्सप्रेसने सकाळी सव्वासहा वाजता दौंड रेल्वे स्थानक सोडल्यानंतर राधादेवी सारडा यांना त्यांची पर्स चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. या पर्समध्ये सोन्याच्या सहा बांगड्या, सोन्याचे पट्टे असलेले घडयाळ, एक मोबाईल संच, एटीएम कार्ड, ओळपत्रे व रोख रक्कम असा एकूण ३ लाख ९४ हजार रूपयांचा एेवज होता. सदर पर्स चोरी प्रकरणी राधादेवी सारडा यांनी नगर लोहमार्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर सदर फिर्याद दौंड लोहमार्ग पोलिसांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आली. पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले असता दौंड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक सहाच्या पुणे बाजूच्या पुढे सदर रिकामी पर्स आढळून आली. चोरट्यांनी पर्स मधील चीजवस्तू चोरून नेत राधादेवी सारडा यांची ओळखपत्रे फेकून दिली होती. 

लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणी योगेश रमेश माने (वय २४, रा. गौतमनगर, दौंड) व लकी लालचंद कृपलानी (वय २७, रा. सिंधी गल्ली, दौंड) या दोन संशयितांना अटक केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com