डॉक्‍टरांनी रुग्णांशी सुसंवाद वाढवावा - ऍड. उज्जवल निकम 

डॉक्‍टरांनी रुग्णांशी सुसंवाद वाढवावा - ऍड. उज्जवल निकम 

हडपसर - ""काही सोनोग्राफी केंद्रात गैरप्रकार होत असल्याने "पीसीपीएनडीटी' कायद्याची आवश्‍यक आहे. मात्र या कायद्यातील अनेक जाचक अटींमुळे अनेकदा डॉक्‍टरांना वेठीस धरले जाते. त्यामुळे या कायद्यात बऱ्याच दुरुस्तींची गरज आहे. यासाठी डॉक्‍टरांनी संघटित होऊन शासन दरबारी या कायद्यात दुरुस्ती करण्याबाबत पाठपुरावा करण्याची गरज आहे, असे मत ऍड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. 

स्पेशालिस्ट डॉक्‍टर्स असोसिएशन आयोजित मेडिको लीगल कॉन्फरन्सचे प्रमुख पाहुणे म्हणून निकम बोलत होते. याप्रसंगी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता अजय चंदनवाले, पुणे शहर स्पेशालिस्ट डॉक्‍टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. दिलीप माने, डॉ. स्मिता शर्मा, डॉ. ललित कपूर, अतिरिक्त आयुक्त प्रदीप देशपांडे, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, स्पेशालिस्ट डॉक्‍टर्स अससोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. एच. साळे, सचिव डॉ. अनुराधा जाधव, सहसचिव डॉ. चेतन म्हस्के, खजिनदार डॉ. विजय पवार, डॉ. दीपा पाठक, डॉ. अमर शिंदे व शहरातील 400 स्पेशालिस्ट डॉक्‍टर या कार्यशाळेस उपस्थित होते. 

ऍड. निकम म्हणाले, ""डॉक्‍टरांवर हल्ले होतात. त्यांचे संरक्षण केवळ कायद्याने होऊ शकत नाही. यासाठी डॉक्‍टरांनी रुग्णांशी सुसंवाद वाढवून दोघांमधील दरी कमी करण्यासाठी प्रयत्न वाढवायला हवेत. व्यवसायात प्रामाणिकपणा, स्पष्टवक्तेपणा जपायला हवा. रुग्णालयात येणारा रुग्ण व त्यांचे नातेवाईक हल्ला का करतात, याबाबत अत्मपरीक्षण करायला हवे. रुग्णांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे.'' डॉ. माने म्हणाले, ""पुणे शहरात प्रथमच तज्ज्ञ डॉक्‍टर्स असोसिएशनची स्थापना झाली. या माध्यमातून डॉक्‍टर्स व रुग्ण यांच्या हिताचे काम करण्यात येईल. लहान नर्सिंगरूम कमी खर्चात रुग्णांना सेवा उपल्बध करून देतात. मात्र शासनाच्या धोरणामुळे ते बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. छोटी रुग्णालये सुरू राहण्यासाठी विकास आराखड्यात शासनाने शिथिलता आणण्याची गरज आहे. यासाठी स्पेशालिस्ट डॉक्‍टर्स असोसिएशन प्रयत्नशील राहील.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com