कोपर्डी प्रकरणातील नराधम येरवडा मध्यवर्ती कारागृहात

Yerwada Jail
Yerwada Jail

येरवडा : कोपर्डी बलात्कार व खून प्रकरणातील गुन्हेगारांना बुधवारी रात्री सव्वा अकरा वाजता येरवडा मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य गुन्हेगार जितेंद्र शिंदे सहगुन्हेगार संतोष भवाळ आणि नितिन भैलुमे यांना फाशीची शिक्षा झालेल्या कैद्यांना ठेवतात अशा स्वंतत्र खोल्यांमध्ये ठेवण्यात आल्याचे अधिकृत सुत्रांकडून सांगण्यात आले. 

येरवडा मध्यवर्ती कारागृहात बुधवारी रात्री उशीरा कोपर्डी बलात्कार व खून प्रकरणातील तीनही गुन्हेगारांना नगरवरून कडोकोट बंदोबस्तात आणण्यात आले. तर येरवडा पोलिस ठाण्यातील दोनशे पोलिस कर्मचारी येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंदोबस्तासाठी होते. ते रात्री सव्वा अकरा वाजता कारागृहात दाखल झाले. त्यानंतर कारागृहातील नियमाप्रमाणे त्यांची संपूर्ण तपासणी केली गेली. त्यांना कारागृहाचे कपडे देण्यात आले मात्र त्यांना कोणता क्रमांक दिला याची तपशील मिळू शकला नाही. 

येरवडा मध्यवर्ती कारागृहात दहशतवाद्यांना ठेवण्यासाठी असलेल्या अंडा सेलमध्ये वीस खोल्या,अतिसुरक्षा विभागात तीस खोल्या तर युरोपियन प्रिझर्न्स अर्थात ‘बी’ वार्डात चाळीस खोल्या आहेत.यामध्ये सरकारी अधिकारी, पोलिस आणि इतर कैद्यांकडून जीवीताला धोका असणाऱ्या कैद्यांना ठेवण्यात येते. तर फासीची शिक्षा सुनावलेल्यांना ठेवण्यासाठी दहा स्वतंत्र खोल्या आहेत. यापैकी खोल्यांमध्ये शिंदे, भवाळ आणि भैलुमे यांना स्वतंत्र ठेवण्यात आल्याचे समजते.

येरवडा मध्यवर्ती कारागृहाची क्षमता २४२४ असून सुद्धा कारागृहात क्षमतेपेक्षा दुप्पट म्हणजे पाचहजार कैदी ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी सत्तर टक्के कैदी ‘अंडरट्रायल’ असून तीस टक्के कैदी शिक्षा सुनावले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com