शिरसाई उपसासिंचन योजना थकीत पाणी पट्टीमुळे कोलमडली 

विजय मोरे 
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

उंडवडी (पुणे) : शिरसाई उपसा सिंचन योजना शेतकऱ्यांकडील थकीत पाणीपट्टी व योजने महावितरणने विजबिल थकल्यामुळे वीज पुरवठा खंडीत केल्याने योजना अडचणी सापडली आहे. या योजनेची लाभार्थी गावात सुमारे 75 लाख रुपये थकीत पाणी पट्टी असून महावितरणाने दीड लाख रुपये वीजबिल थकल्याने योजनेचा वीजपुरवठा खंडीत केला आहे. त्यामुळे योजनेच्या साठवण तलावात पाणी असूनदेखील योजना सुरु होवू शकलेली नाही. परिणामी योजनेच्या लाभार्थी गावात पाण्याची आवश्यकता असतानाही संबंधित गावे रब्बी हंगामात पाण्यापासून वंचित आहेत.    

बारामतीच्या तालुक्याच्या जिरायती भागातील शिर्सुफळ, साबळेवाडी, उंडवडी सुपे, कारखेल, खराडेवाडी, सोनवडी सुपे, जळगाव सुपे, अंजनगाव, जराडवाडी, उंडवडी कडेपठार, गोजुबावी आदी गावांच्या शिवाराला ही योजना वरदान ठरत आहे. ही योजना शिर्सुफळ येथील ब्रिटिश कालीन तलावावर अवलंबून आहे. या तलावात खडकवासला कालव्यातून पाणी सोडले जाते. आणि आवश्यकतेनुसार शिरसाई उपसा योजनेच्या विद्युतपंपाद्वारे पाणी उचलून ते संबंधित लाभार्थी गावांना देण्यात येते.
 मात्र ही योजना थकीत पाणी पट्टी आणि वीजबिलापोटी महावितरणने वीजजोड बंद केल्याने बंद पडली आहे. त्यामुळे संबंधित गावांना योजनेच्या साठवण तलावात मुबलक पाणी असूनदेखील रब्बी हंगामात या योजनेचे आवर्तन मिळू शकलेले नाही. 
या योजनेचे संबंधित लाभार्थी गावात सुमारे 75 लाख रुपये थकीत पाणी असून या योजनेचे दीड लाख रुपये वीजबिल थकीत आहे. शंभर टक्के थकबाकी भरल्याशिवाय योजना सुरु होणार नाही. अशी भूमिका पाटबंधारे विभागाने घेतल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. 

या भागातील शेतकऱ्यांना सलग तीन चार वर्षे दुष्काळाशी सामना करावा लागल्याने या हंगामात शंभर टक्के थकीत पाणीपट्टी भरणे शक्य नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाने थकबाकीचे आवर्तनानुसार तीन ते चार टप्पे करून थकबाकी वसूल करावी, या आवर्तनासाठी तीस ते चाळीस टक्के रक्कम शेतकऱ्यांकडून जमा करून घ्यावी, व योजना तातडीने  कार्यान्वित करावी. अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. लाभार्थी गावातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात योजनेचे पाणी सुटेल या आशेवर चारा पिके घेतली आहेत. मात्र जलसंपदा विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. पुणे महानगरपालिकेकडे 354 कोटी थकबाकी असतानाही त्यांना दुप्पट पाणी दिले जाते. मग जनाई शिरसाई योजनेवर असा अन्याय का? असा सवाल उंडवडी कडेपठार येथील माजी सरपंच विठठल जराड यांनी मुख्य अभियंता जलसंपदा विभाग यांना एका निवेदनाद्वारे केला आहे. तातडीने योजनेचे पाणी सोडण्याची मागणी लाभार्थी शेतकऱ्यांसह जराड यांनी केली आहे. 

Web Title: Marathi news pune news water tax