ज्वारीच्या उपपदार्थ प्रशिक्षणास `पुरंदर`च्या महिला तेलंगणात पोचल्या !

saswad
saswad

सासवड : एेरवी भाकरी करुन खाण्यासाठी ज्वारी पापरली जाते. मात्र जशी हुरड्याला अलीकडे पार्ट्यांमुळे  मुल्य आले. त्याच पध्दतीने ज्वारीची उत्पादकता वाढवित.. त्याचे पोहे, रवा, लाह्या, बिस्कीटे, पापड, कुरडई केली तर त्याचे बाजरमुल्य कितीतरी पटीने वाढते. नेमके हेच शिकण्यासाठी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्याच्या 30 महिला राज्याच्या सीमा पार करुन गेल्या आणि बरेच काही शिकुन आल्या.

महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत पुरंदर तालुक्यातील वीर, चांबळी, परिंचे येथील तीस महिला शेतकऱयांना आधुनिक तंत्रज्ञानाने ज्वारी लागवडीपासून ते ज्वारीचे प्रक्रीयायुक्त उपपदार्थ बनविण्याबाबतचे प्रशिक्षण देण्यासाठी हैद्राबाद (तेलंगणा राज्य) येथे नेले होते. कृषी विभागाच्या आत्मा अंतर्गत आयआयएमआर व राष्ट्रीय भरडधान्य संशोधन केंद्राच्या वतीने हे दोन दिवसीय प्रशिक्षण हैद्राबादला झाले. त्यात पुरंदरच्या महिला चांगल्याच रमल्या.  
 
सासवड (ता. पुरंदर) येथील तालुका कृषी कार्यालयात `कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)` विभाग कार्यरत आहे. या विभागाने हे प्रशिक्षण सहलीचे नियोजन केले होते. त्याची पार्श्वभूमी अशी की, पुरंदर तालुका तसा कोरडवाहू अधिक. पाऊस कमी पडत असल्याने येथे खरीप हंगामात बाजरी व रब्बी हंगामात ज्वारी अधिक घेतली जाते. परंतु तुलनेत ज्वारीची उत्पादकता कमी व बाजारभावही कमी मिळतो. त्यासाठी ज्वारीची लागवड करताना व नंतर त्याचे पिक व्यवस्थापन करताना.. आधुनिक तंत्रज्ञान अवलंबण्याची गरज असते. हे तंत्रज्ञान शिकण्यासाठी व ज्वारीचे उपपदार्थ कोणते - कोणते होतात, तयार ज्वारी धान्यावर काय - काय व कशी प्रक्रीया करतात.. हे प्रशिक्षण घेण्यासाठी पुरंदरच्या या महिलांना आत्माचे संचालक सुनिल बोरकर यांच्या संकल्पनेतून हैद्राबादच्या अभ्यास सहलीस नेले होते. तिथे दोन दिवसांच्या प्रशिक्षणात ज्वारी लागवडीचे तंत्र, पिक व्यवस्थापन, पिक काढणी, मळणी याच्यापासून ते ज्वारीपासून विविध खाद्य पदार्थ, पोहे, रवा, लाह्या, बिस्कीटे, पापड, कुरडई आदी बनविण्याविषयी या महिलांनी प्रशिक्षण घेतले. तेथील तज्ज्ञांनी..

महिलांना ज्वारीच्या बाजार मुल्य वाढीसाठी त्यावरील प्रक्रीया उद्योगाची उभारणी करण्याचा सल्ला दिला. घरगुती पध्दतीने व्यवसाय केले तरी स्वयंरोजगारही तालुक्यातील गावोगावी उपलब्ध होईल., असे स्पष्ट केले. या प्रशिक्षणास सुनिल बोरकर यांच्यासह आत्माचे उपप्रकल्प संचालक अनिल देशमुख, तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांचे सहकार्य लाभले. तर प्रशिक्षार्थी महिला शेतकऱयांसमवेत हैद्राबादला तंत्रज्ञान व्यवस्थापक गणेश जाधव, स्मिता वर्पे, शेतकरी प्रतिनीधी विठ्ठल पांगारे आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com