चिंचवडमध्ये तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या 

crime
crime

पिंपरी : राहत्या घरात गळफास घेऊन तरूणाने आत्महत्या केली. ही घटना चिंचवड येथे मंगळवारी (ता.२०) सकाळी उघडकीस आली.

नितीन जगन्नाथ जाधव (वय २०, रा. भागाई निवास, मातोश्री कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड. मूळगाव मंगळवेढा, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत नितीन आणि त्याचा मित्र अक्षय माने हे दोघेजण राहत होते. सोमवारी रात्री अक्षय कामावर गेला असताना नितीन याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

मंगळवारी सकाळी अक्षय कामावरून आल्यावर ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. चिंचवड पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com