झेडपीच्या आरोग्य खात्यामध्ये ६६ पदांची भरतीला मंजूरी

indapur
indapur

वालचंदनगर : पुणे जिल्हातील नव्याने सुरु होणाऱ्या ३ प्राथमिक आरोग्य केंद्रे व सात उपकेंद्रामधील ६६  कर्मचाऱ्यांच्या पद भरतीला राज्यशासनाने मंजूरी दिली असल्याची माहिती आमदार दत्तात्रेय भरणे व झेडपीचे आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती प्रवीण माने यांनी दिली.

पुणे जिल्हामध्ये तीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे व सात उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाली आहेत. मात्र गेल्या अनेक महिन्यापासुन राज्यशासनाने पुणे जिल्हा परिषदेला प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रामध्ये कर्मचारी भरतीसाठी परवानगी देत नसल्याने प्राथमिक  आरोग्य केंद्रे व उपकेंद्र धुळखात पडून होते.यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळण्यास अडचण होत होती. इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रेय भरणे  यांनी नोंव्हेबर मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील रिक्त जागा तातडीने भरण्याची मागणी केली होती.   

राज्यसरकारने याची दखल घेत १६ फेब्रुवारी रोजी परिपत्रक काढून राज्यातील १२४ बांधकाम पूर्ण असलेल्या अारोग्य संस्थेमधील ५१६ नियमित पदे ,५८५ काल्पनिक कुशल पदे व ५९ अकाल्पनिक अकुशल पदांची भरती करण्यास मंजूरी दिली आहे.यामध्ये पुणे जिल्हातील शेळगाव(इंदापूर), लांडेवाडी,अवसरी खुर्द(आंबेगाव) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये  वैद्यकीय अधिकारी (प्रत्येकी - २), आरोग्य साहय्यक (पुरुष), आरोग्य साहय्यक (स्त्री), साहय्यक परिचारिका प्रसविका (ए.एन.एम) प्रत्येकी एका नियमित पदांची भरती करण्यात येणार आहे. याच आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य साहय्यक,प्रयोग शाळा तंत्रज्ञ,आैषधनिर्माण अधिकारी,कनिष्ठ लिपिक,वाहन चालक,स्त्री परिचर  यांची प्रत्येकी एक व पुरुष परिचराची प्रत्येक तीन काल्पनिक कुशल पदाची भरती होणार आहे.व अकुशल काल्पनिक सफाईकामगारांची प्रत्येकी एका पदाची भरती होणार आहे.तर 

जिल्हातील कुंभारगाव(इंदापूर), पिंपळे( पुरंदर),खडकी (आंबेगाव), खोर ,मिरवाडी (दौंड), वरुडे (शिरुर), गोजूबावी (बारामती) येथील सात उपकेंद्रामध्ये आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेविका (स्त्री), अंशकालिन स्त्री परिचर पदाच्या प्रत्येकी एका जागेची भरती होणार आहे. 

शेळगाव (ता.इंदापूर) येथे गेल्या दोन वर्षापासुन सुमारे दीड कोटी रुपये खर्चुन बांधण्यात आलेली प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत धुळ खात पडून आहे. जिल्हा परिषद सदस्य भारती मोहन दुधाळ यांनी वर्षाभरामध्ये तीन वेळा सर्वसाधरण सभेमध्ये आरोग्य केंद्र सुरु करण्याची  जोरदार मागणी केली होती.या मागणी यश आल्याचे दुधाळ यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com