पुणे जिल्ह्यातील शाळा व्यवस्थापन सदस्यांना प्रशिक्षण

training
training

शिर्सुफळ (पुणे) : जिल्हा परिषद शाळा व प्रशासन यामधील महत्त्वाचा दुवा म्हणजे शाळा व्यवस्थापन समिती. मात्र अनेक महत्वाचे अधिकार असलेल्या या समितीच्या अज्ञानामुळे सदर समिती स्थापनाचा हेतु साध्य होत नव्हता. या पार्श्वभूमीवर शासनाने शाळा व्यवस्थापन सदस्यांना प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यासाठी पुणे जिल्ह्यातील 3 हजार 917 शाळा व्यवस्थापन समित्यांच्या 23 हजार 502 सदस्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी तब्बल 47 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. यामुळे शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव होणार आहे. यासाठी प्रशिक्षण फक्त कागदोपत्री पार न पडता त्यांची नियोजनबध्द अंमलबजावणीची गरज व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या प्रशिक्षणासाठी शासनाने भरीव आर्थिक तरतुद उपलब्ध करून दिली आहे. या अंतर्गत पहिले प्रशिक्षण केंद्रस्तरावर होणार असून त्याअंतर्गत शाळा व्यवस्थापन समिती आदर्श शाळा भेट उपक्रमाचे आयोजन करून शाळा विकासाबाबत चर्चा घडवून आणावी हा उद्देश आहे. दुसरे प्रशिक्षण शाळास्तरावर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य घेणार आहेत. या प्रशिक्षणाचा उपयोग आपल्या शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच शैक्षणिक गुणवत्तेत आपली शाळा अग्रस्थानी राहील यासाठी सदस्यांनी शिक्षकांना प्रोत्साहित करावे. तसेच आपल्या शाळेची पटसंख्या टिकून राहावी यासाठी व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षक, पालक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यामध्ये योग्य समन्वयाची भूमिका असावी. यासाठी होणार आहे.

या प्रशिक्षणाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात आदर्श शाळा भेट असणार आहे. यामध्ये शाळांमधील शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, त्यांच्यासाठी चहा, जेवण आवश्यक स्टेशनरी यांची व्यवस्था, भेटीच्या दिवशी स्वागत परिचय, शाळा ओळख, वर्ग भेटी, शालेय परिसर भेट होणार आहे. तर टप्पा दोनमध्ये केंद्र प्रमुखांच्या सहाय्याने प्रत्येक समुह केंद्रातील शाळांमधील प्रत्येक शाळेतील शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांसाठी केंद्रस्तरावर शिक्षण परिषद होणार आहे. या शिक्षण परिषदेत केंद्रातील वैशिष्टयपुर्ण शाळांच्या यशोगाथेचे सादरीकरण, शिक्षण, हक्क कायदा उदबोधन, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम, शाळा विकास आराखडा निर्मिती इ. बाबींवर सदस्यांचे उद्बोधन करण्यात येणार आहे.

याबाबत बोलताना पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष दत्तात्रय वाळुंज म्हणाले, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रशिक्षणाचा उद्देश चांगला आहे. मात्र याच्या योग्य अंमलबजावणीचा गरज आहे.

पुणे जिल्ह्यातील तालुकानिहाय अनुदान वितरण तक्ता
अ.क्र. तालुका / गट शाळा व्यवस्थापन समिती संख्या / अपेक्षित प्रशिक्षणार्थी संख्या / प्रत्यक्ष वर्ग केलेली रक्कम
1    आंबेगाव - 298  / 1788   /  357600
2    बारामती -  287 / 1722  / 344400
3    भोर - 281 / 1686  / 337200
4    दौंड - 291 / 1746 / 349200
5    हवेली - 230  / 1380  / 276000
6    इंदापुर - 383  / 2298  / 459600
7    जुन्नर - 366  / 2196  / 439200
8    खेड - 410  / 2460  / 492000
9    मावळ  - 302  / 1812  / 362400
10    मुळशी  -  220 /  1320 / 264000
11    पुरंदर   - 227  / 1362  / 272400
12    शिरूर  -   372 / 2232  / 446400
13    वेल्हा   - 145  / 870  / 174000
14    पिंपरी -  58 /  348 / 69600
15 आकुर्डी -   47  / 282  / 56400
एकूण   -   3917 / 23502 /  4700400

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com