रखडलेली अनेक प्रकल्प मार्गी लावली - मोहोळ 

रखडलेली अनेक प्रकल्प मार्गी लावली - मोहोळ 

पुणे  - वर्षानुवर्षे रखडलेले महत्त्वाचे प्रकल्प यंदा मार्गी लावले. विशेषत- वाहतूक समस्या सोडविण्यासाठी मेट्रो, नवे उड्डाण पूल आणि गरिबांना स्वस्तात घरे देण्याच्या उद्देशाने आखलेल्या योजनेचा आराखडाही तयार केला आहे. नवे कचरा प्रक्रिया प्रकल्प, समान पाणीपुरवठा, नदीसुधार, "एचसीएमटीआर' मार्ग आणि सायकल योजनांना गती मिळाली,'' असे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. 

महापालिकेत सत्ता स्थापन करून भारतीय जनता पक्षाला नुकतेच एक वर्षे पूर्ण झाले. त्यानिमित्त गेल्या वर्षभरातील कामे, त्यांची सद्य-स्थिती आणि भविष्यातील परिणामकारकता याचा आढावा मोहोळ यांनी मांडला आहे. महापालिकेच्या 2018-19 च्या अर्थसंकल्पात शाश्‍वत विकासाच्या योजनांना प्राधान्य असेल, ज्यामुळे शहराच्या विकास प्रक्रियेला अधिक गती मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 

मोहोळ म्हणाले, ""मेट्रोच्या कामाचा वेग वाढला असून, त्याचे जाळे विस्ताराच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. चांदणी चौकातील उड्डाण पुलाच्या कामासाठी भूसंपादनाची प्रक्रिया करण्यात येत असून पहिल्या टप्प्यात आवश्‍यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला आहे. कर्वे रस्त्यावर अभिनव चौक (नळस्टॉप) आणि कर्वे पुतळा येथे उड्डाण पूल उभारण्याची कार्यवाही वेगाने सुरू आहे. याच काळात रखडलेल्या प्रकल्पांना निधी देऊन ते मार्गी लावले आहेत.'' वाहतुकीला प्राधान्य देतानाच पुढील वीस वर्षांचा आराखडा तयार केला आहे. नदीसुधार योजना (जायका), नदीकाठ व संवर्धन योजना पुढे सरकल्या आहेत. नव्या अकरा गावांमध्ये सेवा-सुविधा पुरवून त्यांचा विकास आराखडा (डीपी) करण्यात येत आहे. मिळकतधारकांसाठी विमा योजना, आरोग्य योजनेसह शिवसृष्टीचा प्रश्‍नही सोडविल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com