संस्कृतभारतीतर्फे पुणे जिल्हा संस्कृत संमेलन सासवडला

marathi news pune sasvad sanskrutbharati sammelan
marathi news pune sasvad sanskrutbharati sammelan

सासवड - संस्कृतभारती ही संस्कृत भाषेच्या प्रसारासाठी काम करणारी एक स्वयंसेवी संस्था आहे. या संस्थेतर्फे रविवार (ता. २१) रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ दरम्यान संपूर्ण पुणे जिल्ह्याचे संस्कृत संमेलन सासवड (ता. पुरंदर) येथील कुंजीरवाडाच्या यशवंतराव चव्हाण भवनात होत आहे. हे संमेलन केवळ दर तीन वर्षांनी एकदाच होत असते. यंदाच्या या संमेलनासाठी पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्र आणि इतर १३ तालुक्यांमधून अनेक संस्कृतप्रेमी व्यक्ती मोठ्या संख्येने येणार आहेत. 

या संमेलनाच्या निमित्ताने प्रमुख आकर्षण म्हणजे संस्कृत आणि विज्ञान व आर्य चाणक्यांचे अर्थशास्त्र या अत्यंत माहितीपूर्ण दुर्मिळ संस्कृत प्रदर्शिनी बघायला मिळणार आहेत. दिवसभर संस्कृत संदर्भात विविध कार्यक्रम आहेत. शालेय शिक्षकांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ सदस्य (संस्कृत भाषा विभाग) श्री. माधवराव केळकर यांचे विशेष मार्गदर्शन या संमेलनात लाभणार आहे. संस्कृत प्रदर्शिनीसोबतच संस्कृत भाषा लोकप्रिय आणि व्यवहारोपयोगी बनविण्यासाठीचा एक अभिनव प्रयोग म्हणून संस्कृत दिनदर्शिका व सुलभतेने संस्कृत शिकण्यासाठी संस्कृत भारतीने प्रकाशित केलेली विविध विशेष पुस्तके, आणि संस्कृत सुभाषिते, श्लोक, वचन आदी मुद्रीत केलेले सदरे, टी शर्ट्स्, चहा/कॉफीचे मग, शबनम पिशव्या, पुस्तकातील वाचनखुणा (बुकमार्क) इत्यादी साहित्य असेल. 

या सर्व अत्यंत कल्पकतेने तयार केलेल्या वस्तू पाहण्यास व खरेदीसाठी उपलब्ध होणार आहेत. तरी पुणे जिल्ह्यातील सर्व संस्कृतप्रेमी मंडळींनी सम्मेलनामध्ये सहभागी होऊन संस्कृतमय वातावरणाचा लाभ घ्यावा, अशी आयोजकांनी विनंती केली आहे. इच्छुकांनी त्वरित तालुकानिहाय संपर्क व्यक्तींशी संपर्क साधावा, असे आवाहन आहे. या संमेलनाला कोण कोण अपेक्षित आहेत, याविषयी सांगताना संयोजकांनी म्हटले आहे की 'सर्व क्षेत्रातील संस्कृत प्रेमी, शालेय व महाविद्यालयीन संस्कृत शिक्षक/प्राध्यापक, संस्कृततज्ज्ञ/पंडित, संस्कृत शिकू इच्छिणारे, संस्कृत शिकवू शकणारे, संस्कृत शिक्षण घेणारे व घेतलेले, घवघवीत यश मिळवलेले विद्यार्थी/विद्यार्थीनी, आयुर्वेदाचार्य, श्रीमद् भगवद्गीता पठण करणारे, गीता शिकवणारे इत्यादी लोक सहभागी होऊ शकतात.' अधिक माहिती व संपर्कासाठी सासवडचे ओंकार चिंबळकर ७५८८९५५४२१, वीणा पिटके ९८८१२१५२०१, पुणे ग्रामीण जनपद संयोजक ओंकार नाझरकर ९८८१७१८९७९, अभिजित तोडकर ९१४५९०८१५६ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com