सिंथेसायझर शिकण्याची सुवर्णसंधी

सिंथेसायझर शिकण्याची सुवर्णसंधी

पुणे - ‘मधुरांगण’चे सभासद, कुटुंबीय व ‘सकाळ’च्या वाचकांसाठी ‘मधुरांगण’ आणि संगीतकार केदार भागवत यांच्या वतीने पाच दिवसांच्या सिंथेसायझर प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यातील बॅचेसना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर खास लोकाग्रहास्तव शेवटची बॅच होत आहे. 

पं. जसराज, पं. हरिप्रसाद चौरसिया, शंकर महादेवन, हरिहरन, सुरेश वाडकर, कुणाल गांजावाला, शान अशा दिग्गज गायकांसोबत काम केलेले संगीतकार केदार भागवत यांनी स्वत- या कार्यशाळेचा आराखडा तयार केला असून, अशाप्रकारचे सांगीतिक मार्गदर्शन असलेली ही एकमेव कार्यशाळा आहे. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. २६ फेब्रुवारी ते २ मार्च रोजी नवीन बॅच सुरू होत आहे. थोड्याच जागा शिल्लक आहेत.

कार्यशाळेत काय शिकविणार?  
भारतीय व पाश्‍चात्त्य संगीताचा मूलभूत अभ्यास, सिंथेसायझरची रचना, सिंथेसायझरवर शास्त्रशुद्ध पद्धतीने गाणी वाजविण्याची योग्य पद्धत, स्वर व तालांची ओळख, नोटेशन्स लिखाण व वाचन तसेच स्वत-ची गाणी स्वत- बसविण्यासाठी ती कशा पद्धतीने ऐकावीत आणि वाजवावीत याबद्दल मार्गदर्शन करण्यात येईल. यातील सहभागी पाच दिवसांत तीन बेसिक लेव्हलची गाणी स्वत- वाजवू शकतील. सिंथेसायझर नोटेशन व इतर सर्व साधनसामग्री सहभागींना देण्यात येईल. तसेच मधुरांगण सभासदांना केदार भागवत यांच्या ‘सोनसडे’ या अल्बमची सीडी भेट देण्यात येईल.
 

कार्यशाळेविषयी...
 नावनोंदणी - कार्यशाळेच्या ठिकाणी किंवा ‘सकाळ’ मुख्य कार्यालय, ५९५, बुधवार पेठ, सकाळ मधुरांगण विभाग, दुसरा मजला, पुणे (वेळ ११ ते ६) 
 ठिकाण - केदार भागवत म्युझिक ॲकॅडमी, आनंदधाम-बेलवलकर हाउस, भांडारकर इन्स्टिट्यूटसमोर, आयडिया मोबाईल गॅलरीशेजारी, लॉ कॉलेज रस्ता, एरंडवणे. (रविवारीही नोंदणी करता येईल.) 
 अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क - ९०७५०१११४२ किंवा ८३७८९९४०७६ 
 शुल्क भरण्याची वेळ - सकाळी १०.३० ते सायं. ६.३० 
 कालावधी - बॅच २६ फेब्रुवारी ते २ मार्च (रोज २ तास) 

 दररोज सहा बॅचेस 
 सकाळी १० ते १२, दुपारी १२ ते २, २ ते ४, ४ ते ६, सायं. ६ ते ८, रात्री ८ ते १० 
 प्रवेशमूल्य - तीन हजार रुपये (जागा मर्यादित)  प्रवेशमूल्य रोख, धनादेश किंवा ऑनलाइन ट्रान्स्फरद्वारे भरून पूर्वनोंदणी करणे आवश्‍यक आहे. 

मधुरांगण सभासदत्व नोंदणीसाठी 
 हजारो रुपयांची ‘फ्री व्हाउचर्स’ 
 वार्षिक सभासदत्व शुल्क ९९९ रुपये 
 नोंदणीनंतर सभासदांना ‘तनिष्का’च्या १२ अंकांसह १ हजार ४९९ रुपये किमतीच्या २३ पिसेसच्या मल्टिपर्पज सेटची भेट. (भेटवस्तूसाठी कृपया मोठी पिशवी आणावी.) 
 नामवंत ब्रॅंड्‌सची हजारो रुपयांची फ्री गिफ्ट व्हाउचर व डिस्काउंट व्हाउचर भेट 
 ऑनलाइनसाठी प्ले स्टोअरवर ‘madhurangan’ टाइप करा, ॲप डाउनलोड करूनही सदस्यत्व नोंदणी शक्‍य. पासवर्ड ६ ते ७ डिजिटचा असावा. 
 कुरिअरचा ऑप्शन निवडून सभासदत्व आणि रक्कम ऑनलाइन भरल्यास गिफ्ट व इतर सर्व साहित्य घरपोच 
 ॲपवरून नोंदणी करणाऱ्यांना सर्व भेटवस्तू १५ दिवसांनंतर मिळतील; अन्यथा ‘सकाळ’च्या बुधवार पेठ कार्यालयात संपर्क साधून (सकाळी ११ ते सायं. ६) या वेळात भेटवस्तू नेता येतील. 
 ॲपव्यतिरिक्त नोंदणीसाठी - ‘सकाळ’ मुख्य कार्यालय, ५९५, बुधवार पेठ, पुणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com