रायगड जिल्ह्यासह सुधागडमध्येही कडकडीत बंद

अमित गवळे
बुधवार, 3 जानेवारी 2018

पाली : कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या निषेधार्थ बुधवारी (ता.३) रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. सुधागड तालुक्यातील पाली, परळी, पेडली या मोठ्या बाजारपेठा देखील बंद ठेवण्यात आल्या होत्या. जिल्ह्यात सकाळी राज्य परिवहन मंडळाची लांबच्या व जवळच्या पल्ल्याची वाहतुक सुरळीत सुरु होती. तसेच अनेक स्कूल बस देखील विद्यार्थ्यांना शाळेत घेवून जात होत्या. दुपार नंतर मात्र वाहतुकीवर परिणाम झाला.

 सुधागड तालुक्यासह जिल्ह्यात सर्व शहरांत आंबेडकरी अनुयायी व बहुजन समाज बांधवांनी घोषणा देत निषेध रॅली तर निषेध बाईक रॅली काढल्या होत्या. सुधागडमध्ये पाली सुधागड तहसिलदार व पाली पोलीस स्टेशनला या घटनेच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले. भिमा कोरेगावच्या हिंसाचाराचे मास्टर माइंड असलेल्या आरोपींना तत्काळ अटक करा व त्यांच्यावर ऍट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करा अशी मागणी सुधागड तालुका बौध्दजन पंचायत र.नं.2756, सुधागड तालुका रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया, सुधागड तालुका रिपब्लीकन सेना, विवीध पुरोगामी संस्था व संघटनांच्या वतीने करण्यात आली.
 
सकाळी सात वाजल्या पासून आंबेडकरी अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पाली येथे जमा झाले होते. यावेळी सुधागड तालुक्यात मोटारसायकल रॅली काढून निषेध दर्शविण्यात आला. यावेळी प्रभाकर गायकवाड, दिलीप जाधव, दिपक पवार, महेंद्र गायकवाड, रि.पा.इं. सुधागड तालुकाध्यक्ष राहूल सोनावळे, युवक अध्यक्ष अमित गायकवाड, रिपब्लीकन सेनेचे सुधागड तालुकाध्यक्ष मंगेश वाघमारे, भगवान शिंदे, रविंद्रनाथ ओव्हाळ, के.टी. गायकवाड, दिपक गायकवाड, राजेश नाना गायकवाड, धम्मशिल सावंत, सुधागड तालुका बौ.पं.म.क.महिला अध्यक्षा रोहिणी जाधव, नुतन शिंदे, आदिंसह भीम अनुयायी, बहुजन समाज बांधव मोठया संख्येने उपस्थीत होते. कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: Marathi news raigad news raigad and sudhagad strike