घरफोडीप्रकरणी चौघांना अटक 

घरफोडीप्रकरणी चौघांना अटक 

पुणे - घरफोडी करणाऱ्या चार जणांना अंलकार पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 14 गुन्हे उघड झाले. सुमारे 25 लाख रुपयांचा ऐवजही पोलिसांनी जप्त केला आहे. 

जगशी मंगा बुटिया (वय 50, रा. शेडगेवस्ती, कान्हेगाव, ता. मावळ), राकेश ऊर्फ राजेश पोपट वाघमारे (32, रा. वडगाव मावळ), भरत विजयी बुटिया (35, रा. गांधीनगर, देहूरोड), जयंती केशव बुटिया (32, रा. भोते वस्ती, सोमाटणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. रविवार पेठेतील सराफी कारागीर शंकर सुफलचंद बारुई (वय 39, रा. रविवार पेठ, मूळ कोलकता) यालाही पकडले. 

घरफोडी करणाऱ्या टोळ्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी, गस्त वाढविण्यावर भर दिला आहे. अलंकार पोलिस ठाण्यातील मार्शल भाऊसाहेब ढापसे आणि गौस मुलाणी हे डहाणूकर कॉलनीत मध्यरात्री गस्त घालत होते. तेव्हा तेथून जाणाऱ्या एका मोटारीला त्यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र मोटार जोरात निघून गेल्याने पोलिसांनी पाठलाग करून त्यांना अडविले. मोटारीची तपासणी केल्यानंतर त्यात घरफोडीसाठीच्या वस्तू मिळाल्या. अधिक चौकशीनंतर घरफोडी केल्याची माहिती दिली. सराफी कारागीर बारुई हा त्यांच्याकडून चोरीचा माल विकत घेत होता. उपायुक्‍त डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रेखा साळुंखे, सहायक निरीक्षक संदीप बुवा, पोलिस कर्मचारी श्रीकांत चव्हाण, राजेंद्र लांडगे, किरण नेवसे आदींनी ही कारवाई केली. वाघमारे याला यापूर्वी घरफोडीच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली होती. तेव्हा त्याच्याकडून घरफोडीचे पाच गुन्हे उघड झाले होते. इतर आरोपी हे सोमाटणे फाटा भागातील नर्सरीत काम करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com