गृहप्रकल्पांचे पर्याय खरेदीदारांना भावले 

गृहप्रकल्पांचे पर्याय खरेदीदारांना भावले 

पुणे - गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या "सकाळ वास्तू एक्‍स्पो 2018'ला रविवारी गृहखरेदीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नामांकित बांधकाम कंपन्यांचे पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणांसह पुण्याजवळील गृहप्रकल्पांचे अनेक पर्याय खरेदीदारांना भावले. काहींनी गृहप्रकल्पांचे थेट बुकिंगही केले. बुकिंगवर त्यांना खास सवलतीही देण्यात आल्या. उत्कृष्ट आणि मनाला भावतील अशा गृहप्रकल्पांना खरेदीदारांनी पसंती दर्शविली. परवडणाऱ्या घरांच्या मोठ्या शृंखलेसह आलिशान घरांसाठीचे अनेक पर्याय येथे पाहता आले. 

या एक्‍स्पोत सुमारे तीसहून अधिक बांधकाम व्यावसायिकांचे 150 हून अधिक प्रकल्प खरेदीदारांना पाहायला मिळाले. एक्‍स्पोमध्ये फ्लॅट्‌स, प्लॉट्‌स, सेकंड होमसाठीचे अनेक पर्याय आणि लक्‍झरियस घरांची माहिती त्यांना घेता आली. काहींनी बजेटमधील घरांचे थेट बुकिंग करत सुटीच्या दिवशी घर खरेदी करण्याचे निमित्त साधले. सुटीचा दिवस असल्याने खरेदीदारांनी एक्‍स्पोला आवर्जून भेट दिली. एकाच छताखाली सुविधा, ऍमेनेटीज, लोकेशन आणि आसपासच्या परिसराबद्दल मनात दडलेल्या शंकांचे निरसन त्यांना करता आले. साधारणत- नऊ लाखांपासून दोन कोटी रुपयांपर्यंतची घरे येथे त्यांना पाहता आली. 

पुण्याच्या चौफेर असलेले वन बीएचके फ्लॅट ते एखादे कार्यालय घेण्यापर्यंतचे उत्कृष्ट पर्याय खरेदीदारांसाठी उपलब्ध करून दिले होते. तसेच, रिअल इस्टेटशी निगडित होमलोनपासून फायनान्सपर्यंतच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे खरेदीदारांना येथे मिळाली. काही व्यावसायिकांमार्फत घरांच्या बुकिंगवर अल्टो कार आणि सोन्याचे नाणे भेट देण्यात आले. एकूणच शेवटच्या दिवशी एक्‍स्पोला खरेदीदारांनी गर्दी केली. 

"बॅंक ऑफ महाराष्ट्र'ची गृहकर्ज योजना 
"बॅंक ऑफ महाराष्ट्र'च्या गृहकर्ज योजनेची माहिती गृहखरेदीदारांना येथे घेता आली. बॅंकेने ग्राहकांसाठी खास योजना सादर केली. थेट बुकिंग केल्यास गृहकर्ज सुविधाही त्यांनी उपलब्ध करून दिली. विशेष म्हणजे नियमित परतफेड केल्यास दोन ईएमआय माफ करण्याची सोयही येथे होती. पगारातून अधिकाधिक 70 टक्के कपात, दीर्घकालीन परतफेडीसाठी कमी ईएमआय, इतर बॅंक आणि टॉप-अप कर्जावरील टेकओव्हरसाठी आवश्‍यक कालावधी केवळ 18 महिने होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com