सासवडला 22 मार्च पासून कुस्ती स्पर्धा 

kusti
kusti

सासवड (पुणे) - पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने पुरंदर तालुका कुस्तीगीर संघ व पुरंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने `पुरंदरच्या लाल मातीचा राजा` या पुरंद व हवेली तालुक्यांसाठीच्या यंदाच्या कुस्ती स्पर्धा गुरुवार (ता. 22) पासून सासवडला सुरु होत आहेत. यात विविध वजननिहाय गटांतील विजेते व उपविजेत्यांना चांगली बक्षिसे आहेत.

माजी आमदार कै. चंदुकाका जगताप यांनी ही कऱहेकाठची कुस्ती स्पर्धा व आखाडा सुरु केला. तीच परंपरा युवा नेते व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप पुढे चालवित आहेत. यंदा या स्पर्धेचे मार्गदर्शक राज्य कुस्तीगीर परीषदेचे सरचिटणीस पै. बाळासाहेब लांडगे असून, ता. 22 रोजी दुपारी तीन वाजता सासवडच्या श्री. भैरवनाथ कुस्ती स्टेडीयममध्ये स्पर्धांचा शुभारंभ होईल. यावेळी तहसिलदार सचिन गिरी, पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, मुख्याधिकारी विनोद जळक आदी अनेक उपस्थित राहतील. तर बक्षिस वितरणास माजी राज्यमंत्री दादा जाधवराव, माजी खासदार अशोक मोहोळ, जि. प. अध्यक्ष विश्वास देवकाते, जिल्हा बँक अध्यक्ष रमेश थोरात, स्मार्ट सिटीचे सीईओ राजेंद्र जगताप, डॉ. दिगंबर दुर्गाडे आदी उपस्थित राहतील. असे आयोजक श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे रविंद्रपंत जगताप यांनी सांगितले. 

वजननिहाय गट व बक्षिसे..
खुला गट - विजेत्यास - 31000, उपविजेत्यास 25000 
74 किलो - विजेत्यास - 21000, उपविजेत्यास 15000 
66 किलो - विजेत्यास - 15000, उपविजेत्यास 11000 
60 किलो - विजेत्यास - 13000, उपविजेत्यास 11000 
55 किलो - विजेत्यास - 11000, उपविजेत्यास 9000 
50 किलो - विजेत्यास - 7000, उपविजेत्यास 6000
45 किलो - विजेत्यास - 6000, उपविजेत्यास - 5000
40 किलो - विजेत्यास - 5000, उपविजेत्यास - 4000
35 किलो - विजेत्यास - 4000, उपविजेत्यास - 3000
30 किलो - विजेत्यास - 3000, उपविजेत्यास - 2000

यंदा सन्मान अभिजीत कटकेंसह तिघांचा..
पुरंदरच्या कऱहेकाठच्या कुस्ती आखाड्यात यंदा महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके, हिंद केसरी दिनानाथ सिंह, राष्ट्रीय तालीम संघाचे विश्वस्त तात्यासाहेब भिंताडे यांचा विशेष गौरव होणार आहे. शिवाय अगोदरचे महाराष्ट्र केसरी व विविध पुरस्कारप्राप्त मल्लांनाही निमंत्रित केले आहे., असे संयोजन समितीचे राजेंद्र जगताप, प्रकाश जगताप, विनोद जगताप, भगवान म्हेत्रे आदींनी सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com