भक्तिसंगीताची सूरमयी संध्याकाळ "स्वरभाव' 

भक्तिसंगीताची सूरमयी संध्याकाळ "स्वरभाव' 

पुणे - "सकाळ सह्याद्रि सुरक्षा कवच'च्या सभासदांसाठी या वर्षीचा मनोरंजनाचा दुसरा कार्यक्रम "स्वरभाव' मंगळवारी (ता. 27) सायंकाळी 6.30 वा. घरकुल लॉन्स, डी. पी. रोड, म्हात्रे पूल येथे सादर केला जाणार आहे. भक्तिसंगीताच्या "स्वरभाव' या कार्यक्रमाचे संगीत संयोजन सुप्रसिद्ध संगीतकार "अविनाश- विश्‍वजित' करणार आहेत. 

या कार्यक्रमात महाराष्ट्राचे लाडके गायक "शौनक अभिषेकी व सावनी शेंडे-साठ्ये' विविध भक्तिगीते सादर करणार असून, त्यांना तबला - प्रसाद जोशी, पखवाज - पद्‌माकर गुजर, पर्कशन - संतोष पेढेकर, हार्मोनिअम - उदय कुलकर्णी हे साथसंगत करतील. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रसिद्ध नृत्यांगना बिचित्रा मुखर्जी परमेश्‍वराला समर्पित काही रचना कथकच्या माध्यमातून रसिकांसमोर सादर करणार आहेत. त्यांचे सादरीकरण पारंपरिक भजनाबरोबरच त्यांनी स्वतः लिहिलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या मिश्र रागातील बंदिशीवर आधारित असेल. त्यांना गायन व हार्मोनिअमवर वैभव मंकड, तबला - सत्यप्रकाश मिश्रा साथसंगत करतील. राजेश दामले सूत्रसंचालन करणार आहेत. शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीतावर आधारित ही भक्तिसंगीताची सुरेल संध्याकाळ सभासदांच्या सदैव स्मरणात राहणार हे निश्‍चित! लोटस खाकरा, शबरी खाकरा हे कार्यक्रमाचे प्रायोजक तर हॉटेल श्रेयस स्थळ प्रायोजक आहेत. 

सभासदांसाठी सूचना  
सभासदांसाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी प्रवेश विनामूल्य 
9075011142 या क्रमांकावर प्रवेश नोंदणी सकाळी 11 पासून अथवा 
7721984442 या क्रमांकावर व्हॉट्‌सऍपवरून नावनोंदणी करू शकता. 
कार्यक्रमाच्या 15 मिनिटे आधी प्रवेश दिला जाईल. 
ओळखपत्र, माहिती पुस्तिकेतील दुसऱ्या क्रमांकाची प्रवेशिका व सभासद कार्ड सोबत आणणे आवश्‍यक. 
काही जागा राखीव. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com