'शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार' छाया खुटेगावकर यांना जाहीर

Patthe bapurav award
Patthe bapurav award

हडपसर : कै. पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला मंडळाच्यावतीने देण्यात येणारा 'शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार' जेष्ठ्य लावणी नृत्यांगना छाया खुटेगावकर यांना जाहीर झाला आहे. तर लोकसाहित्यिक 'डॉ .भास्करराव खांडगे' पुरस्कार लावणी गायिका नंदा सातारकर यांना, तर कै. पठ्ठे बापूराव यांचे पटशिष्य 'बापुसाहेब जिंतीकर पुरस्कार' शाहीर बाळासाहेब मालुसकर यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जयप्रकाश वाघमारे व कार्याध्यक्ष सत्यजित खांडगे यांनी दिली.

लोककला क्षेत्रासाठी योगदान देणा-या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. प्रतिष्ठेच्या समजला जाणा-या शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्काराने राजश्री नगरकर, चंद्राबाई तांबे, कांताबाई सातारकर, शाहीर बाबूराव काटे, सरस्वतीबाई कोल्हापूरकर, अशा जुन्या पिढीतील नामांकीत कलावंताना लोककलेस प्रोत्साहन देणारे बाळदादा मोहीते पाटील, सिने अभिनेत्री आशा काळे यांना सन्मानीत करण्यात आले होते. पुरस्काराचे हे २०वे वर्ष आहे. 

शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार रोख १५००० रूपये, डॉ. भास्करराव खांडगे पुरस्कार रोख १०,००० रूपये व बाप्पुसाहेब जिंतीकर पुरस्कार रोख ५००० रूपये, स्मृतीचीन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुरस्कार वितरण समारंभ मंगळवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी महात्मा फुले सांस्कृतिक भवन, वानवडी येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी दुपारी १ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम प्रवेशिका मोफत उपलब्ध आहेत. महिलांसाठी बाल्कनी राखीव ठेवण्यात आली आहे. डॉ. शंतनू जगदाळे, रेश्मा परितेकर, संदिप घुले, मित्रावरूण झांबरे, बाप्पु जगताप, आकाश वाकचौरे, भरत हगवणे या पुरस्कार निवड समितीच्या सदस्यांनी पुरस्कार्थींची निवड केली आहे. लावणी महोत्सवात विजयता व कल्याणी नगरकर, रेश्मा व वर्षा परितेकर, कविता बंड निर्मित ढोलकीचा खनखनाट अशा संगीत पार्टींचे कलावंत आपली कला सादर करणार आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com