नगर रस्त्यावर हॉलीहॉक'च्या रंगांची उधळण

Hollyhock.
Hollyhock.

वडगाव शेरी : युरोपमध्ये व आशिया खंडातील काही देशात नजरेस पडणारी हॉलीहॉक जातीची फुले सध्या नगर रस्ता बीआरटी मार्गावर नानाविविध रंगांची उधळण करताना लक्ष वेधून घेत आहेत. रस्ता दुभाजकांवर या परदेशी पाहुण्यांची लागवड करण्याचा प्रयोग पुण्यात प्रथमच राबवण्यात आला आहे. पुणे महापालिकेने लुंकड रियालिटी या बांधकाम व्यावसायिक संस्थेला नगर रस्ता बीआरटी मार्गातील दुभाजकाचे सुशोभिकरण व देखभाल करण्याची जबाबदारी दिलेली आहे. संस्थेचे संजय येलपुरे, राहुल दागलिया, दत्ता निकाळजे यांच्या देखरेखीखाली हा प्रयोग राबवण्यात आला असून पालिकेचे उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे व प्रिती सिन्हा यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.

याविषयी माहिती देताना दत्ता निकाळजे म्हणाले, हॉलीहॉक ही फुलझाडाच्या प्रजातीला थंड हवामान मानवते. ही फुलझाडे वर्षभर फुले देतात. लाल, पांढरा, जांभळा, गुलाबी असे सुमारे पाच ते सहा रंगांची फुले येथे पाहायला मिळतात. हॉलीहॉची लागवड करण्यापूर्वी दुभाजकाच्या मातीत शेणखत टाकून मशागत केली. त्यानंतर बीयांची लागवड केली. रात्रीच्या वेळी टँकरने पाणी घालून ही फुलझाडे जगवली आहेत. उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे म्हणाले, पुण्यात दुभाजकावर ही फुले प्रथमच लावली आहेत. फुले दिसायला सुंदर आणि मधमाशांना आकर्षित करणारी आहेत. यापूर्वीही येथे सुर्यफुल लागवडीचा प्रयोग यशस्वी केला होता. पुण्यात उद्यानातील फुलांच्या प्रदर्शनासाठी आणि सजावटीसाठी हॉलीहॉक लावला जातो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com