विसर्जनासाठी पुण्यातील धरणांतून पाणी सोडले

राजेंद्रकृष्ण कापसे
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

दोन तीन दिवसांपासून धरण क्षेत्रातील पाऊस थांबला आहे. त्यामुळे शतकोत्तर रौप्यमहोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी खडकवासला धरणातून 1284 क्यूसेक पाणी मुठा नदीत सोडण्यात आले आहे.

पुण्यातल्या गणेशोत्सवाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव यंदा साजरा होत असताना पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तीन ही धरणात 100 टक्के पाणी साठा जमा झालेला आहे. 

दोन तीन दिवसांपासून धरण क्षेत्रातील पाऊस थांबला आहे. त्यामुळे शतकोत्तर रौप्यमहोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी खडकवासला धरणातून 1284 क्यूसेक पाणी मुठा नदीत सोडण्यात आले आहे.

हे पाणी उद्या (बुधवार) दुपारपर्यंत सोडले जाणार आहे. दरम्यान तीन धरणे भरलेली आहेत. आज-उद्या पाऊस झाल्यास धरणातून 1284 क्यूसेक पेक्षा जास्त पाणी सोडले जाऊ शकते, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाने दिली आहे.

Web Title: Marathi News water released Khadakwasala dam Ganesh immersion procession