छेडछाड ठरेल दखलपात्र गुन्हा

Marathi News_Baramati_Tampering crime_Interrogation offense
Marathi News_Baramati_Tampering crime_Interrogation offense

बारामती - शालेय किंवा महाविद्यालयीन युवतींची छेड काढणे या पुढील काळात युवक व विवाहीत पुरुषांना महागात पडू शकते, कारण असा प्रयत्न करणा-यांविरुध्द दखलपात्र गुन्हे दाखल करण्याचे निर्देश कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिले आहेत. काल बारामतीत नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी बारामती पोलिसांना याबाबत आता कडक भूमिका घेण्याचे निर्देश दिले आहेत. काल झालेल्या बैठकीत महाविद्यालयीन युवतींसह छेडछाडीच्या घटनांबाबत सातत्याने उल्लेख झाला. याची नांगरे पाटील यांनी गंभीर दखल घेत फौजदार वर्षा जगदाळे यांना काही सूचना केल्या.

पोलिसांनी छेडछाडीचे प्रकार जेथे होतात त्यांचे हॉटस्पॉट तयार केले आहे. त्यात त्यांनी ए बी सी असे तीन प्रकार केले आहेत. जेथे असे प्रकार सातत्याने होतात अशा ठिकाणांना ए प्रकारात समाविष्ट केले असून तेथे दामिनी व निर्भया पथकाने दररोज भेट द्यावी. बी प्रकारात समाविष्ट असलेल्या ठिकाणांना तीन दिवसातून एकदा तर सी प्रकारात आठवड्यातून एकदा भेट देण्याचे निर्देश आहेत. याबाबत आता पालकांनीही आपल्या मुलांना अशा प्रकारांपासून दूर राहण्याबाबत वारंवार सांगितले पाहिजे. अशा कोणत्याही घटनातून विद्यार्थी किंवा विवाहीत पुरुष सापडले तर त्यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल होणार असल्याने मुलांचे करिअर धोक्यात येऊ शकते याची जाणीव पालकांनीही ठेवणे गरजेचे आहे, असे पोलिसांनी आवाहन केले आहे. 

अल्पवयीन मुलांची काळजी घेण्याची गरज नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या नुकत्याच आलेल्या अहवालातून समोर आली आहे. अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीबाबत महाराष्ट्र देशात दुस-या क्रमांकावर तर चो-या, दरोडे, अतिप्रसंगासारख्या गुन्ह्यात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानावर असल्याची बाब चिंताजनक आहे, असे नांगरे म्हणाले. आपली अल्पवयीन मुले कुठे जातात, काय करतात, त्यांचे मित्र कोण आहेत, त्यांच्या वर्तनात अनपेक्षित बदल होतात का, याबाबत पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. मुलगा किंवा मुलगी दोघांशीही पालकांचा सुसंवाद असणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com