यशवंत निवारा योजनेतंर्गत २५ अपंग लाभार्थ्यांना २५ लाख रुपयांचा निधी
वालचंदनगर - पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील २५ अपंग लाभार्थ्यांना यशवंत निवारा योजनेतंर्गत घरकुले मंजूर झाली असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून मागासवर्गीय गरजू अपंग लाभार्थ्यांना यशवंत निवारा योजनेतंर्गत घरकुले मंजूर केली जातात.

या योजनेमध्ये लाभार्थी असणाऱ्या व्यक्तीस झेडपीच्या माध्यमातून घर बांधण्यासाठी एक लाख रुपये दिले जातात. सन २०१७-१८ मध्ये पहिल्या टप्यामध्ये तालुक्यातील २५ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यासंदर्भात माने यांनी सांगितले की, पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना जलद गतीने राबविण्याचे काम सुरु आहे. तालुक्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी तालुक्यासाठी अधिक निधी उपलब्ध करुन दिला जाईल. दुसऱ्या टप्यामध्ये तालुक्यातील उर्वरीत लाभार्थ्यांना यशवंत निवारा योजनेतंर्गत घरकुल बांधण्यासाठी झेडपीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन दिला जाईल असल्याचे सांगितले.