छायाचित्रांतून अनुभवा लग्न सोहळा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

पुणे - मेहंदी समारंभातील वेगळेपण...हळदीच्या कार्यक्रमाची धमाल...त्यानंतर बॅण्ड बाजा बारात अन्‌ आनंद, उत्साह अशा लग्नातील विविध सोहळ्याच्या छायाचित्रांचे एकत्रित कोलाज ‘वेडिंग फोटोग्राफी प्रदर्शना’त रसिकांना सोमवारी पाहायला मिळाले. 

‘पुणे फोटोग्राफर्स आणि व्हिडिओग्राफर्स असोसिएशन’तर्फे हे प्रदर्शन आयोजिले आहे. सुमारे ४० छायाचित्रकारांनी लग्न सोहळ्यात टिपलेली १५० हून अधिक छायाचित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन सोमवारी छायाचित्रकार विकास इंगळे आणि मानव जैन यांच्या हस्ते झाले.

असोसिएशनचे अध्यक्ष अभय कापरे, उपाध्यक्ष यशवंत खोजे, सचिव जितेंद्र कोपर्डे, अजय बेलसरे या वेळी उपस्थित होते. मेहंदी समारंभापासून ते लग्न सोहळ्यापर्यंतची वेगवेगळी छायाचित्रे यात पाहता येतील. बंगाली, मराठी, ख्रिश्‍चन अशा विविध लग्नसोहळ्यातील वधू-वरांचे वेगवेगळ्या भावमुद्रेतील छायाचित्रे पाहता येतील. पारंपरिक लग्नातील वधू-वरांची छायाचित्रे यात आहेत. हे प्रदर्शन बुधवारपर्यंत (ता.२९) सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत बालगंधर्व कलादालनात पाहावयास खुले राहील.

Web Title: marriage event in photography