छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या 

छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या 

पुणे : सासरच्या छळास कंटाळून विवाहितेने कॅनॉलमध्ये उडी मारून आत्महत्या केली. ही घटना वडगाव बुद्रुक येथे घडली. याप्रकरणी पतीसह सासू- सासऱ्यावर सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

विमल गणेश लिंबोरे (वय 33, रा. तुकाईनगर, वडगाव) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती गणेश लिंबोरे याच्यासह सासू- सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश व विमल यांचा 2008 मध्ये विवाह झाला होता. त्यानंतर त्यांना एक मुलगा झाला. विमल यांचा किरकोळ कारणावरून सासरच्यांकडून सातत्याने मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. या छळास कंटाळून विमल यांनी घराजवळ असलेल्या कॅनॉलमध्ये उडी मारून आत्महत्या केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com