'मावळ बंद'ला आंदर मावळात उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

टाकवे बुद्रुक - मराठा आरक्षण मागणी साठी पुकारलेल्या 'मावळ बंद'ला आंदर मावळात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मावळ बंदचे आवाहन केले होते, या आवाहनाला साद देत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंदला पाठिंबा दिला. वैदकीय सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प होते.शाळा महाविद्यालये बंद होती. आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे अशी  उद्विग्नता व्यक्त करीत कार्यकर्ते बंद मध्ये सहभागी झाले.  

तुमचे आमचे नाते काय, जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा लाख मराठा,छत्रपती शिवाजी महाराज की जय,छत्रपती संभाजी महाराज की जय,शाहू महाराज की जय या घोषणा देणारे तरूण ठिकठिकाणी होता.कान्हे फाटा,जांभूळगाव फाटा,ब्राम्हणवाडी येथे कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता. वडगाव पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

रोखून धरला होता. वडगाव पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदर मावळाची प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखली जाणारी टाकव्याची बाजारपेठ बंद होती, त्यापाठोपाठ वडेश्वर,भोयरे या मोठ्या  गावातील व्यवहार बंद होते. फळणे, कोंडिवडे, कल्हाट, कशाळ, किवळे, इंगळूण, पारीठेवाडी, अनसुटे, मानकुली, कुणे, माळेगाव खुर्द, माळेगाव बुद्रुक, तळपेवाडी, पिंपरी, सावळा, खांडी, कुसूर, बेंदेवाडी, डाहूली, कांब्रे, बोरवली, वाहनगाव, नागाथली, शिंदेवाडी, घाटेवाडी, निगडे, शिरे, शेटेवाडी, आंबळे, कदमवाडी, मंगरूळ, नवलाखउंब्रेत बंद पाळण्यात आला. शाळेत विद्याथी आले नाही. खाजगी प्रवासी वाहतूक बंद होती,त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मुख्य मागणीसाठी झालेल्या अंदोलनाला तरूणांचा मोठा उत्साह होता

आंबी वराळे फाटा येथे झालेल्या अंदोलनात मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेतलेले काकासाहेब शिंदे आणि शशिकांत सोनवणे या तरूणांना श्रद्धांजली वाहून तरुणांनी टक्कल करून  सरकारचा निषेध नोंदवला. 

Web Title: 'Maval Band' has a spontaneous response