दुहेरी खुनामुळे मावळ सुन्न 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

लोणावळा - महाविद्यालयीन युवक-युवतीचा खून झाल्याचे सोमवारी (ता. 3) उघडकीस आल्याने पर्यटननगरी असा लौकिक असलेल्या लोणावळ्यासह संपूर्ण मावळ तालुका सुन्न झाला आहे. कुसगाव बुद्रुक येथील लोणावळा सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेला सार्थक वाकचौरे (वय 22, रा. सात्रळ, सोनगाव, जि. नगर) व श्रुती डुंबरे (वय 21, रा. ओतूर, जुन्नर, पुणे) यांचा लोणावळा-ऍम्बी व्हॅली रस्त्यावर आयएनएस शिवाजी केंद्राजवळ डोक्‍यात अवजड वस्तूने प्रहार करून निर्घृण खून झाला. या घटनेमुळे महाविद्यालयात शोककळा पसरली असून, मंगळवारी वातावरण सुन्न करणारे होते. सर्वत्र या घटनेचीच चर्चा सुरू होती. 

काही वर्षांपूर्वी लोणावळा सात फिरस्त्यांचा निर्घृण खूनप्रकरणाने हादरला होता. या घटनेच्या आठवणी सोमवारच्या घटनेने जाग्या झाल्या असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पर्यटननगरी असा लौकिक असलेले लोणावळा- खंडाळा हे पुणे-मुंबईपासून मध्यवर्ती केंद्र आहे. येथे बाहेरच्या गुन्हेगारांचा वावर वाढला आहे. बाहेरून येऊन गुन्हा करायचा, पुरावे नष्ट करायचे असे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत. मात्र, एकेकाळी लोणावळा हे संघटित गुन्हेगारीचे केंद्र होते. त्यांचा कणा पोलिसांनी मोडला होता. वातावरण शांत होते. मात्र, सोमवारची घटना काळिमा फासणारी आहे. 

लोणावळा-खंडाळा शहरांचे नागरीकरण होत असताना व्याप वाढत आहे. पर्यटकांच्या वाढत्या संख्येने शहरावर ताण येत आहे. शहराच्या तुलनेत पोलिसांची संख्याही मर्यादित आहे. त्यामुळे कदाचित गुन्हेगारांनाही बळ मिळत आहे. 

सोमवारच्या घटनेनंतर महाविद्यालय प्रशासन काहीही बोलण्यास तयार नाही. संपूर्ण महाविद्यालय, सार्थक व श्रृतीचे मित्र-मैत्रिणी, अन्य विद्यार्थी मंगळचारी सुन्न होते. खुनाचा छडा लवकरच लागेल. त्याची कारणेही समजतील. मात्र, त्यांच्या खुनास नेमके जबाबदार कुणाला धरायचे, याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे. महाविद्यालयाबरोबर विद्यार्थ्यांनीही जबाबदारीचे भान ठेवण्याची गरज आहे. 

विद्यार्थिनी प्रतिक्रिया 

भावना बिरारी (जेएसपीएम) - काही दिवसांपूर्वीच महाविद्यालयातर्फे कार्यशाळा घेण्यात आली होती. त्यामध्ये सुरक्षिततेसंदर्भात आम्हाला माहिती दिली गेली. त्याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदविल्यास महाविद्यालयाकडून संबंधितांवर कारवाई केली जाते. 

भाग्यश्री येड्डे (एएसएम) - मुलींना स्वसंरक्षण करता यावे, यासाठी महाविद्यालयाकडून दहा दिवसांचे कराटेचे प्रशिक्षण दिले जाते. शिवाय, महाविद्यालयातील वातावरण आरोग्यदायी ठेवण्यावर भर दिला जात असल्याने शक्‍यतो अनुचित प्रकार घडत नाहीत.