पुणे - हडपसर येथे जैव वैद्यकीय कचरा उघड्यावर

संदिप जगदाळे
शनिवार, 21 एप्रिल 2018

हडपसर : ससाणेनगर येथे रूग्णालयात वापरण्यात आलेल्या सिरिंज, बाटल्या, इंजेक्शन, ट्यूब, सलाईन, पाईप, हातमोजे, रक्ताने माखलेला कापूस यासह अन्य कचरा उघड्यावरच टाकण्य़ाचा प्रकार उघडकीस आला आहे. हा जैव वैद्यकीय कचरा लाईफकेअर मल्टीस्पेशालीटी हॅास्पीटल येथील असल्याचे निषपन्न झाले आहे. याबाबत नागरिकांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार केली असून महापालिका काय भूमीका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रुग्णालयातून बाहेर पडणारा कचरा हा मानवी आणि प्राण्यांच्या आरोग्यासाठी सर्वांत घातक आहे. तसेच मुले वरील काही साधनांचा खेळण्यासाठी वापर करीत असतात. यातून अनेक अपायकारक घटना घडू शकतात. तसेच हा कचरा म्हणजे त्याच्यापासून दुसऱ्याला संसर्ग होण्याची किंवा त्यापासून समाजात रोगराई पसरण्याची जोखीम असते. त्यामुळे खासगी रूग्णालयांना संबधित एजन्सीकडे हा कचरा देण्याचे कायद्याने बंधनकारक आहे.

रहिवासी निलेश श्रीगोड महणाले, जैव वैद्यकीय कचरा लाईफकेअर मल्टीस्पेशालीटी हॅास्पीटलचाच आहे. या कच-यामुळे आमचे एक वासरू मृत्यूमुखी पडलेले आहे. उघडयावर कचरा टाकल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत रूग्णालयाशी संपर्क साधला असता रूग्णालयांकडून मला धमकावण्यात आले. याबाबत मपालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार केली असून याबाबतची माहिती पोलिसांना देखील दिली आहे.

लाईफकेअर मल्टीस्पेशालीटी हॅास्पीटलचे संचालक डॅा. प्रसाद जोगदंड म्हणाले, आम्ही आमच्या रूग्णालयातील कच-याची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावतो. ससाणेनर रेल्ले पटरी कडेला टाकलेला जैव वैदयकीय कचरा व त्यात आमच्या रूग्णालयाची प्रिसक्रीपशन कशी सापडली आहेत. याबाबत आम्हाला देखील माहिती नाही. आम्ही आमचा कचरा महापालिने नेमलेल्या एजन्सीकडेच देत असतो. त्यामुळे नक्की हा कचरा उघडयावर कसा पडला आहे, याबाबत आम्हीच शाशंक आहोत. तरीही आम्ही हा कचर संबधित ठिकाणावरून उचलला असून त्याची विल्हेवाट लावली आहे. याप्रकरणी आम्ही कोणालाही धमकावलेले नाही.

याबाबत महापालिकेचे विभागीय आरोग्य अधिकारी दिनेश भेंडे म्हणाले, घडलेल्या प्रकाराबाबत नागरिकांनी केलेली तक्रार अदयाप माझ्य़ापर्यंत आलेली नाही. संबधित घटनेची चौकशी करून संबधिक रूग्णालयावर नियमानुसार कारवाई केली जाईल. 

Web Title: medical waste at open in hadapsar pune