हडपसरमध्ये महापालिकेचा योजना माहिती मेळावा

संदीप जगदाळे
गुरुवार, 24 मे 2018

हडपसर - महापालिकेच्या समाजविकास विभाग यांच्या वतीने राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान व इतर योजना माहिती मेळावा आयोजित करण्यात आला होता. या यावेळी समाजविकास विभागाच्या उपायुक्त संध्या गागरे उपस्थित होत्या. सामाजिक, आर्थिक आणि गरिबी निर्मुलन उपक्रमाच्या अंमलबजावणीचा महापालिकेच्या प्रमुख व अविभाज्य कर्तव्यांमध्ये समावेश झाला आहे. समाज विकास विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी महिलांनी ऑनलाईन अर्ज करावा. महिलांनी केवळ पापड, लोणचे, स्वयंपाक याच चौकटीत न अडकता संगणक, तंत्रशास्त्र, विविध व्यवसाय प्रशिक्षणाद्वारे महिला सक्षमिकरण सहज शक्य आहे.

हडपसर - महापालिकेच्या समाजविकास विभाग यांच्या वतीने राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान व इतर योजना माहिती मेळावा आयोजित करण्यात आला होता. या यावेळी समाजविकास विभागाच्या उपायुक्त संध्या गागरे उपस्थित होत्या. सामाजिक, आर्थिक आणि गरिबी निर्मुलन उपक्रमाच्या अंमलबजावणीचा महापालिकेच्या प्रमुख व अविभाज्य कर्तव्यांमध्ये समावेश झाला आहे. समाज विकास विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी महिलांनी ऑनलाईन अर्ज करावा. महिलांनी केवळ पापड, लोणचे, स्वयंपाक याच चौकटीत न अडकता संगणक, तंत्रशास्त्र, विविध व्यवसाय प्रशिक्षणाद्वारे महिला सक्षमिकरण सहज शक्य आहे. समाज विकास विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी समाजसेवक, समुहसंघटीका यांच्याशी संपर्क साधा असे अवाहन समाजविकास विभागाच्या उपायुक्त संध्या गागरे यांनी केले.

याप्रसंगी स्थायी समिती सदस्य मारुती आबा तुपे, प्रभाग समिती अध्यक्षा हेमलताताई मगर, समाजविकास विभागाच्या उपायुक्त संध्या गागरे, समाजसेवक राजेंद्र मोरे, समाज संघटीका मंजुषा कंकुरीकर, सुषमा बनसोडे, अण्णा गाडेकर, जयश्री जयाभाय, अस्पायर इन्स्टिट्युटचे अमित गांधी, समुहसंघटीका हेमलता भोसले, पल्लवी पाटील, मनिषा निकुडे, सोनाली घोडके, अनुपमा तांबे, रेश्मा झुरुंगे, पुनम गायकवाड उपस्थित होते. 

तुपे यांनी समाज विकास विभागाच्या विविध प्रमुख योजनांची माहिती देत म्हणाले, "पुणे महानगरपालिकेचा समाज विकास विभाग मागासवर्गीय कल्याण योजना, महिला व बाल कल्याण योजना, युवा कल्याण योजना, अपंग कल्याण योजना, केंद्र सरकारची दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण जीवनमान मिशन), अपंगांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देणारी डॉ. बाबा आमटे योजना, जेष्ठ नागरिक आणि विधवांना प्राथमिक आरोग्य सुविधांसाठी मासिक आर्थिक सहाय्य पुरविणाऱ्या अनुक्रमे माता जिजाऊ स्वावलंबी जीवन योजना (महिला), स्वावलंबी जीवन योजना (पुरुष) आणि माता रमाई भीमराव आंबेडकर योजना (विधवा) यासारख्या विविध योजना यशस्वीपणे राबवित असल्याने नागरिकांना याबाबत कोणतीही अडचण येणार नाही याचीही जबाबदारी समाज विकास विभागाकडून घेण्यात येईल असे सुचित केले. 

Web Title: Meet the Municipal Corporation's information plan in Hadapsar