"बॅलिस्टिक्‍स सोसायटी'चे पुणे विद्यापीठाला सदस्यत्व 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

पुणे - क्षेपणास्त्र विज्ञानाच्या प्रसारासाठी जागतिक पातळीवर प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या इंटरनॅशनल बॅलिस्टिक्‍स सोसायटीचे (आयबीएस) सभासदत्व मिळविण्याचा मान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मिळाला आहे. यापूर्वी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेला (डीआरडीओ) हा मान मिळाला आहे. हा मान मिळविणारे पुणे विद्यापीठ हे देशातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. 

संरक्षण क्षेत्रातील सर्वोच्च संशोधन संस्था असणारी "डीआरडीओ' ही आयबीएसची देशातील एकमेव सभासद आहे. विद्यापीठातील "सेंटर फॉर मॉडेलिंग अँड सिम्युलेशन' विभागाने या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. क्षेपणास्त्र विज्ञानाच्या प्रसारासाठी 1960मध्ये "आयबीएस'ची स्थापना झाली आहे. क्षेपणास्त्र विज्ञानात अनुभव आणि तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. संरक्षण क्षेपणास्त्र विज्ञानात व्यावसायिक संधी निर्माण करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे "आयबीएस'ने स्पष्ट केले आहे. 

विद्यापीठाला हे सभासदत्व मिळाल्यामुळे क्षेपणास्त्र विज्ञानात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवे दालन खुले होण्याची शक्‍यता आहे. तसेच, विद्यापीठाला आता संरक्षण क्षेत्रात "वेपन सिस्टिम्स'संदर्भात संशोधन करणाऱ्या इतर देशातील संस्थांशी वैचारिक देवाण-घेवाण करण्याची, इतर सभासद देशांतील संस्थांमधील संशोधन आणि तंत्रज्ञानाची ओळख करून घेण्याची संधी मिळणार आहे. 

Web Title: Membership of Ballistix Society Pune University