#MeToo 'नाना पाटेकरांना बेड्या ठोका'

arrest nana patekar women congress supports tanushree dutta in harassment case
arrest nana patekar women congress supports tanushree dutta in harassment case

मुंबई : मुंबईतील ओशिवरा पोलिस स्टेशनबाहेर मुंबईतील काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन करुन अभिनेते नाना पाटेकर यांच्या अटकेची आज (गुरुवार) मागणी केली. नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने केल्यानंतर नाना पाटेकर यांच्यासह चौघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या समर्थनात आता मुंबईतील महिला काँग्रेस उतरली आहे. काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी नाना पाटेकर यांना बेड्या ठोकण्याची मागणी केली आहे. तनुश्री दत्ताने तब्बल 5 तास जवाब नोंदवला आहे. आयपीसी कलम 354 (छेडछाड) आणि 509 (महिलेस लज्जा उत्पन्न होईल अशाप्रकारचे कृत्य करणे) अन्वये अभिनेता नाना पाटेकर, हॉर्न ओके प्लीज चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश सारंग, कोरिओग्राफर गणेश आचार्य आणि निर्माते सामी सिद्दीकी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

तनुश्री दत्ता हिच्या लेखी तक्रारीची दखल राज्य महिला आयोगाने घेतली असून, आयोगाने नाना पाटेकर यांना नोटीस बजावली होती. तनुश्रीच्या तक्रारीत उल्लेख असलेल्या नाना पाटेकरांसोबत गणेश आचार्य, सामी सिद्दीकी, राकेश सारंग यांना आयोगाने नोटीस बजावली असून 10 दिवसात आपले म्हणणे आयोगाकडे मांडण्याचे निर्देश दिले आहेत.

काय आहे प्रकरण?
बॉलिवूडपासून दूर गेलेली अभिनेत्री तनुश्री दत्ताने आपल्यासोबत गैरवर्तन झाल्याची आठवण काही दिवसांपूर्वी सांगितली होती. 2008 साली 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटाच्या सेटवर अभिनेते नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता. 'हॉर्न ओके' चित्रपटाच्या एका गाण्याचे चित्रीकरण सुरु होते. त्यावेळी नाना पाटेकरांनी मला बाहुपाशात घेतलं. कोरिओग्राफर्सना दूर व्हायला सांगून नृत्य कसा करावा, हे ते दाखवत होते, असा दावा तनुश्रीने केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com