मेट्रोच्या भूमिपूजनाला शरद पवारांनाही बोलवा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यासाठीच्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत व्यासपीठावर पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे यांच्यासह १५ जणांचा समावेश केला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही केंद्र सरकारने सन्मानाने आमंत्रित करावे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे. पवार यांना आमंत्रित केले नाही, तर ‘योग्य वेळी, योग्य निर्णय’ घेण्याचे सूतोवाच महापौर जगताप यांनी शुक्रवारी केले. त्यामुळे मेट्रोच्या भूमिपूजनाचा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत. 

पुणे स्टेशनजवळील ‘एसएसपीएमएस’ संस्थेच्या मैदानावर २४ डिसेंबर रोजी पंतप्रधानांची जाहीर सभा होणार आहे. त्यात ऑनलाइन पद्धतीने मेट्रोचे भूमिपूजन होईल. कार्यक्रम सायंकाळी सहाच्या सुमारास होणार आहे.

व्यासपीठावर पंतप्रधानांसह पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे महापौर आदी १५ जण असतील. या बाबतची माहिती पंतप्रधान कार्यालयाला मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहे.’’ कार्यक्रम स्थळाची पाहणी करण्यासाठी नॅशनल सिक्‍युरिटी गार्डचे (एनएसजी) पथक सोमवारी पुण्यात येणार आहे. त्यानंतर कार्यक्रमाचे स्थळ आणि अन्य व्यवस्था निश्‍चित होतील. या कार्यक्रमाला सुमारे ३० हजार नागरिक बसू शकतील, अशी आसनव्यवस्था असेल. काही जागा निमंत्रितांसाठी तर, उर्वरित जागा नागरिकांसाठी खुल्या असतील, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी शुक्रवारी दिली. या पार्श्‍वभूमीवर महापौर म्हणाले, ‘‘मेट्रो प्रकल्पाचा राष्ट्रवादी काँग्रेसने २००४ ते २०१४ दरम्यान वारंवार पाठपुरावा केला. पवार, पक्षाचे नेते अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळेच मेट्रो प्रकल्प साकारत आहे. त्याला शरद पवार यांना सन्मानाने बोलविले नाही, तर पक्ष योग्य विचार करेल.’’ राष्ट्रवादी काँग्रेसने पवार यांच्या हस्ते २२ डिसेंबर रोजी मेट्रोचे भूमिपूजन करण्याचा निर्णय या पूर्वी जाहीर केला आहे, तर या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही बोलविण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.