पुणेकरांसाठी येतोय खवय्येगिरीचा महोत्सव

पुणेकरांसाठी येतोय खवय्येगिरीचा महोत्सव

शनिवारपासून ‘एमएच-१२ खाऊ गल्ली- सीझन ४’ला सुरवात

पुणे - पुणेकरांची खवय्येगिरी जगभर प्रसिद्ध आहे. शहराच्या कोणत्या कोपऱ्यात मिळणाऱ्या पदार्थांची खासियत काय आहे हे पुणेकरांना चांगलेच माहिती असते. अशाच अनोख्या खासियतने नटलेल्या, रससशीत आणि चमचमीत पदार्थांच्या खवय्येगिरीचा दोन दिवसांचा महोत्सव येत्या शनिवारपासून (ता. २५) सुरू होतो आहे. ‘खाण्यासाठी जन्म आपुला’ असे म्हणणाऱ्यांना ‘एमएच १२ खाऊ गल्ली - सीझन ४’च्या निमित्ताने हजारो पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. यापूर्वीच्या तीनही सीझनला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर होणाऱ्या या लज्जतदार यात्रेत एकाच छताखाली पिझ्झा, बर्गर, केक, जिलेबी, मिल्क प्रॉडक्‍ट, पुरणपोळी, पाणी पुरी, फापडा चाट, कोल्ड कॉफी, पेस्ट्री, स्नॅक्‍स, व्हेज पॅटिस खारी, चाट, डोर्नाडोज, साऊथ इंडियन राइस, चॉकलेट सॅंडविच, आइस्क्रीम, वांगे भरीत, सोलकढी, बासुंदी, सीझलिंग ब्राऊनी, मोदक, बिस्किट, खांडोळी, बिर्याणी, रोल्स, फिश, कबाब, खिमा पाव, भाकरी, तंदूर, कुल्फी, ग्रिल सॅंडविच, चिकन, मटण, सी फूड अशा असंख्य खाद्यपदार्थांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. या फेस्टिव्हलचे ट्रॅव्हल पार्टनर केसरी टूर्स प्रा. लि., बिर्याणी पार्टनर लॉग हाउस, बॅंकिग पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पझ को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. तर रेस्टॉरंट पार्टनर भैरवी प्युअर व्हेज आहेत.

राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे हा फेस्टिव्हल सकाळी ११ ते सायंकाळी ९ या वेळेत सर्वांसाठी खुला आहे. या फेस्टिव्हलमध्ये स्टॉल असावा अशी इच्छा असणाऱ्यांसाठी संपर्क ८३०८८३१६१३, ९१३०००६९१३ किंवा ७५०७६०३७०९.
 

एमएच-१२ खाऊ गल्ली- सीझन ४
स्थळ - महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पुलाजवळ
ता. २५ व २६ फेब्रुवारी
 वेळ : सकाळा ११ ते सायंकाळी ९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com