खाद्यपदार्थांच्या आस्वादाची आज अखेरची संधी

‘खाऊ गल्ली’ मध्ये खाद्यपदार्थांची खरेदी करताना खवय्ये.
‘खाऊ गल्ली’ मध्ये खाद्यपदार्थांची खरेदी करताना खवय्ये.

चाळीसहून अधिक स्टॉल; खवय्यांसाठी असंख्य पदार्थांची मेजवानी
पुणे - दम बिर्याणी अन्‌ भाकरी पिझ्झा, बटर चिकनच्या सोबतीला खिमा पाव, पुरणपोळीच्या जोडीला थंडगार कुल्फी अशा वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांची दुनिया अस्सल पुणेकर खवय्यांनी शनिवारी अनुभवली.

सुटीचे निमित्त साधत ‘एमएच १२ - खाऊ गल्ली-सीझन ४’मध्ये खवय्यांनी लज्जतदार खाद्यपदार्थांवर ताव मारला. व्हेज बिर्याणीपासून ते खिमा पावपर्यंतच्या असंख्य खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत त्यांनी या फेस्टिव्हलला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  

‘सकाळ’ने आयोजित केलेल्या या फेस्टिव्हलचे उद्‌घाटन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांच्या हस्ते झाले. ‘सकाळ’च्या पुणे आवृत्तीचे सरव्यवस्थापक शैलेश पाटील, ‘केसरी टुर्स प्रा. लि.’च्या सहायक व्यवस्थापकीय संचालिका झेलम चौबळ, ‘डायनामिक डिस्ट्रिब्युटर्स’चे संचालक विकास बैद्य, ‘जेमिनी कुकिंग ऑइल’चे विभागीय विपणन अधिकारी विनीत भोसले, विक्री व्यवस्थापक राजकुमार लोटके, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव, लॉग-हाउसचे संचालक अरुण शिंदे आणि ‘भैरवी प्युअर व्हेज’चे संचालक राहुल मुरकुटे या वेळी उपस्थित होते.

या फेस्टिव्हलमध्ये एकाच छताखाली ४० हून अधिक स्टॉलच्या माध्यमातून खाद्यपदार्थांचा आनंद घेता येत आहे. केक, जिलेबी, फासूस रॅप, मिल्क प्रॉडक्‍ट, सिंहगडचं ताक, पुरणपोळी, फापडा, पेस्ट्री, टोर्नाडोज, आइस्क्रीम, बासुंदी, सीझलिंग ब्राऊनी, मोदक, खांडोळी, बिर्याणी, फिश, खिमा पाव, तंदूर, कुल्फी, चिकन, मटण अशा असंख्य पदार्थांची मेजवानी उपलब्ध आहे. 
या फेस्टिव्हलचे मुख्य प्रायोजक जेमिनी कुकिंग ऑइल, ट्रॅव्हल पार्टनर केसरी टूर्स प्रा. लि., बिर्याणी पार्टनर लॉग-हाउस, इलेक्‍ट्रॉनिक पार्टनर डायनामिक डिस्ट्रिब्युटर्स, बॅंकिंग पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., रेस्टॉरंट पार्टनर भैरवी प्युअर व्हेज आहेत. हे प्रदर्शन रविवारपर्यंत पाहावयास खुले राहील. 

अधिक माहिती
कालावधी - रविवारपर्यंत (ता.२६)
वेळ - सकाळी अकरा ते रात्री नऊ
स्थळ - महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पुलाजवळ
प्रवेश शुल्क - २५ रु. 
सुविधा - मोफत पार्किंग

या फेस्टिव्हलमध्ये लॉग-हाउस गेल्या तीन वर्षांपासून सहभागी होत आहे. दरवर्षी फेस्टिव्हलला आणि आमच्या बिर्याणीला खवय्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो. प्रत्येक हॉटेल व्यावसायिकांच्या खाद्यपदार्थांमध्ये वेगळेपण आहे. तेच वेगळेपण या फेस्टिव्हलच्या निमित्ताने आम्हाला लोकांसमोर मांडता येते. खवय्यांकडूनही त्याला दरवर्षी उत्तम प्रतिसाद मिळतो आणि या फेस्टिवलमध्येही मिळत आहे. 
- अरुण शिंदे, संचालक, लॉग हाउस

फेस्टिव्हलमध्ये एकाच छताखाली पुणेकरांना खाद्यपदार्थांची दुनिया अनुभवता येणार असल्याचा आनंद आहे. हॉटेल व्यावसायिकांना त्यांच्या खाद्यपदार्थांतील वैशिष्ट्ये, गुणवत्ता आणि नावीन्यता खवय्यांसमोर मांडता यावी, यासाठीचे व्यासपीठ असून, खवय्यांच्या खवय्येगिरीला यातून वाव मिळणार आहे. आपल्या पदार्थांमधील वेगळेपण आणि त्याचे सादरीकरण करण्याची संधी व्यावसायिकांना मिळाली आहे.
- संजय शिंदे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग

आपल्या देशाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील खाद्यसंस्कृती. कुठेतरी हीच खाद्यपदार्थांची दुनिया एकाच छताखाली खवय्यांसाठी उपलब्ध करून देण्याचे काम ‘सकाळ’ने केले आहे. केसरी प्रत्येक देश-विदेशातील भ्रमंतीत भारतीय खाद्यपदार्थांचा समावेश करतो. तेच आमचे वैशिष्ट्य आहे. आम्ही या फेस्टिव्हलमध्ये पर्यटकांसाठी टूर्स पॅकेजेस्‌मध्ये खास सवलती ठेवल्या आहेत. 
- झेलम चौबळ, सहायक व्यवस्थापकीय संचालिका, केसरी टूर्स.

खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी आज मायक्रोवेव्ह हा महत्त्वाचा भाग बनला आहे. त्याचीच गृहिणी आणि महिलांना माहिती मिळावी यासाठी फेस्टिव्हलमध्ये मायक्रोवेव्हची संपूर्ण माहिती आणि त्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच प्रत्येक इलेक्‍ट्रॉनिक वस्तूच्या खरेदीवर ५०० रुपये सवलत ठेवण्यात आली आहे. त्यात मायक्रोवेव्ह, कुलर, डिश वॉशर आदीचा समावेश आहे.
- विकास बैद्य, संचालक, डायनामिक डिस्ट्रिब्युटर्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com