मिलिंद एकबोटे यांना सशर्त जामीन मंजूर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

पुणे - कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या घटनेतील आरोपी मिलिंद एकबोटे यांना विशेष न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांनी पंचवीस हजार रुपयांच्या हमीवर सशर्त जामीन मंजूर केला आहे. या निर्णयाच्या विरोधात सरकार उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. 

शिक्रापूर पोलिसांनी एकबोटे यांना हिंसाचारप्रकरणी 15 मार्च रोजी अटक केली होती. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांच्यातर्फे ऍड. एस. के. जैन आणि ऍड. अमोल डांगे यांनी बाजू मांडली. एकबोटे हे ज्येष्ठ नागरिक आहेत, ते समाजसेवेचे काम करतात, असा युक्तिवाद करीत जामीन देण्याची मागणी केली होती. 

सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील विलास पठारे यांनी जामिनास विरोध केला होता. एकबोटे यांना जामीन मंजूर केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल. त्यांनी हा गुन्हा कट रचून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 30 डिसेंबर 2017 रोजी त्यांनी पेरणे फाटा येथे पत्रके वाटल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांना जामीन देऊ नये, अशी विनंती पठारे यांनी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून एकबोटे यांना सशर्त जामीन मंजूर केला. सभांत भाषण न करणे, प्रत्येक सोमवारी शिक्रापूर पोलिस ठाण्यात हजेरी देणे, तपासासाठी बोलावल्यानंतर येणे, पासपोर्ट जमा करणे, न्यायालयाच्या परवानगीशिवाय परदेशात न जाणे, कोणत्याही सभेत सहभागी न होणे, पत्रकार परिषद न घेणे अशा विविध अटी त्यांना घालण्यात आल्या आहेत. या अटींचा भंग केल्यास जामीन रद्द केला जाईल, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. 

Web Title: Milind Ekbote gets conditional bail