राज्य आरोग्य प्रयोगशाळेला पाठविले दुधाचे २४ नमुने

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

पुणे - शहरात पिशव्यांमधून येणाऱ्या दुधाचे दोन दिवसांमध्ये २४ नमुने काढले असून, ते तपासण्यासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेला पाठविले आहेत. शहरात येणाऱ्या दुधाची गुणवत्ता तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासनातर्फे (एफडीए) ही मोहीम राबवली.

पुण्यात दररोज सुमारे चार लाख लिटर दुधाची मागणी असते. जिल्ह्यातील तालुक्‍यांसह नगर, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद येथून पिशव्यांमध्ये भरलेले दूध विक्रीसाठी पुण्यात येते. या दुधाची गुणवत्ता तपासण्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे, अशी माहिती ‘एफडीए’च्या पुणे विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘वेगवेगळ्या मार्गे दुधाच्या पिशव्या पुण्यात विक्रीसाठी येतात. त्यापैकी मोशी, खेड- शिवापूर आणि लोणी काळभोर या नाक्‍यांवरून शहरात येणाऱ्या वाहनातील पिशव्यांमधील दुधाचे नमुने तपासण्यासाठी काढण्याची मोहीम गेल्या आठवड्यात राबविली. प्रत्येक ठिकाणाहून आठ या प्रमाणे २४ नमुने काढले आहेत. हे सर्व तपासण्यासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्याच्या अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.’’ प्रत्येक नागरिकाला पोषक दूध मिळाले पाहिजे. त्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबवली.