'एमआयएम'कडून 55 जागा लढविण्याचा प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जानेवारी 2017

पुणे - ऑल इंडिया मजलीस- इत्तेहाद-उल-मुसलमीनने (एमआयएम) शनिवारी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (बीआरएसपी), रिपब्लिकन युवा मोर्चा व पीपल्स रिपब्लिकन पक्षाबरोबर (कवाडे गट) बैठक घेतली. त्यामध्ये "एमआयएम'ने 55 जागा लढविण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

"एमआयएम'सह सर्व समविचारी पक्षांच्या शहराध्यक्षांची बैठक पार पडली. या बैठकीसाठी "एमआयएम'चे राज्य समितीचे सदस्य अंजुम इनामदार, शहराध्यक्ष जुबेर शेख, "बीआरएसपी'चे प्रदेश महासचिव मिलिंद अहिरे, शहराध्यक्ष दीपक शिकोत्रे, सुमंत जगताप, मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे, प्रदेशाध्यक्षा सुवर्णा डंबाळे, शहराध्यक्ष आश्‍विन दोडके, रिपब्लिकनचे प्रकाश भालेराव उपस्थित होते.

या बैठकीमध्ये 126 जागांवर चर्चा करण्यात आली. या जागांबाबत लवकरच एकमत करण्याचे सर्व पक्षांनी ठरविले आहे. "एमआयएम'ने 55, "बीआरएसपी'ने 37, मोर्चाने 29, तर रिपब्लिकनने पाच जागांची या बैठकीत मागणी केली. या जागांबाबत चर्चा झाली. यासंदर्भात सोमवारी (ता. 23) आणखी बैठक घेण्यात येणार आहे. त्यामध्ये अन्य समविचारी पक्ष व संघटनांनाही सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे "एमआयएम'ने दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.