अल्पवयीन नातीवर अत्याचार; ज्येष्ठासह दोघांविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जानेवारी 2017

पुणे : अल्पवयीन नातीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 77 वर्षीय व्यक्तीसह तिघांना येरवडा पोलिसांनी अटक केली. आजोबांकडून होणारा त्रास आणि काका- मावशीकडून होणाऱ्या मारहाणीबद्दल संबंधित मुलीने शिकवणीच्या शिक्षिकेला माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून ज्येष्ठ नागरिकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई- वडिलांचे छत्र हरपल्याने पीडित मुलगी गेल्या वर्षभरापासून मावशी व काकांकडे राहते. आजोबा लैंगिक अत्याचार करीत असल्याची तक्रार पीडितेने मावशीकडे केली असता त्याकडे दुर्लक्ष करत मावशीने तिला घरकामे करण्यास भाग पाडले. वारंवार मारहाण केली.

औषधाची बाटली फुटल्यावरून काकाने तिला पट्ट्याने बेदम मारले होते. या संदर्भात चाइल्डलाइन संस्थेच्या प्रतिनिधींनी येरवडा पोलिसांशी संपर्क साधून फिर्याद दिली. पोलिस उपनिरीक्षक मनीषा टुले अधिक तपास करीत आहेत.