आमदार भरणे यांनी घेतली माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट

राजकुमार थोरात
रविवार, 10 जून 2018

वालचंदनगर : इंदापुर तालुक्याचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी पुण्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. माजी उपमुख्यमंत्री भुजबळ हे शनिवार (ता.९) पुण्यामध्ये आले होते.

वालचंदनगर : इंदापुर तालुक्याचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी पुण्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. माजी उपमुख्यमंत्री भुजबळ हे शनिवार (ता.९) पुण्यामध्ये आले होते.

पुण्यातील महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची कर्मभुमी समजली जाणारी पुण्यातील गंज पेठेतील महात्मा फुले वाडा येथे फुले यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ साहेब व आमदार दत्तात्रेय भरणे यांनी पुष्पहार अर्पण केला. यानंतर आमदार भरणे यांनी भुजबळ यांची भेट घेवून प्रकृतीची विचारपुस केली. यावेळी भरणे यांनी इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या माध्यमातुन सुरु असलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली.
 
Web Title: mla bharne met former deputy chief minister chhagan bhujbal