आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची शिवसैनिकांकडून तोडफोड, 12 जणांविरुद्ध गुन्हा

शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे यांच्या समवेत जाणाऱ्या आमदार तानाजी सावंत यांच्या सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरातील कार्यालयात घुसून शिवसैनिकांनी शनिवारी तोडफोड केली.
MLA Tanaji Sawant Office
MLA Tanaji Sawant OfficeSakal
Summary

शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे यांच्या समवेत जाणाऱ्या आमदार तानाजी सावंत यांच्या सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरातील कार्यालयात घुसून शिवसैनिकांनी शनिवारी तोडफोड केली.

पुणे - शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे यांच्या समवेत जाणाऱ्या आमदार तानाजी सावंत यांच्या सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरातील कार्यालयात घुसून शिवसैनिकांनी शनिवारी तोडफोड केली. हा प्रकार शनिवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडला असून याप्रकरणी दहा ते बारा अनोळखी व्यक्तींविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर आत्तापर्यंत शांत राहीलेल्या शिवसैनिकांनी शनिवारी अखेर आपला संताप व्यक्त केली. कोल्हापुर, मुंबई, ठाण्यापाठोपाठ पुण्यातही त्याचे पडसाद उमटले.उस्मानाबादचे आमदार तानाजी सावंत यांचे सातारा रस्त्यावरील बालाजी नगर परिसरातील सावंत प्लाझा या इमारतीमध्ये भैरवनाथ शुगर मिल्सचे कार्यालय आहे. संबंधित कार्यालयाची जबाबदारी सावंत यांचे बंधू सांभाळतात. शनिवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास दहा ते बारा शिवसैनिक संबंधित कार्यालयात शिरले. त्यांनी सावंत यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करीत कार्यालाची तोडफोड केली.

त्यामध्ये सावंत यांच्या कार्यालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, सावंत यांचे कार्यालय फोडल्याची माहिती मिळताच सहकारनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तोडफोड करणाऱ्या 10 ते 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हल्ला करणाऱ्यांची अद्याप ओळख पटली नसून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.

'सावंत यांच्या बालाजीनगर येथील कार्यालयाची 10 ते 12 जणांनी तोडफोड केली. त्यांच्याविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तोडफोड करणाऱ्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.'

- सागर पाटील, पोलिस उपायुक्त, परिमंडळ दोन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com