मनसेची यादी आज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

पुणे - मुंबईतील कार्यकर्ता मेळाव्यामुळे पक्षातील बहुतांश पदाधिकारी व्यस्त असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून बुधवारी इच्छुक उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली नाही. शिवसेनेबरोबरच्या युतीची शक्‍यता मावळल्याने आता सर्वच जागांवर पक्षाकडून उमेदवार द्यावे लागणार असल्याने ही यादी गुरुवारी उशिरा जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शुक्रवारपर्यंतची मुदत आहे. अन्य कोणत्याही प्रमुख पक्षाने अद्याप यादी जाहीर न केल्यामुळे मनसेकडूनही यादी जाहीर करण्यात
आलेली नाही. विद्यमान नगरसेवक आणि पक्षातील प्रमुख नेत्यांची स्वाभाविक नावे असलेली पहिली यादी जाहीर केली जाईल. ती यादी यापूर्वीच तयार झालेली आहे; मात्र प्रसिद्ध करण्यात आलेली नाही, असेही सूत्रांनी सांगितले.

Web Title: MNS List Today