मॉन्सून आज अरबी समुद्रात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

पुणे - मॉन्सून शुक्रवारी (ता. २५) अंदमानात दाखल झाले आहे. वाटचालीस पोषक वातावरण असल्याने रविवारी (ता. २७) अंदमान-निकोबार बेटांसह बंगालचा उपसागर आणि दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तर मंगळवारपर्यंत (ता. २९) केरळ आणि तमिळनाडूच्या दक्षिण भागात मॉन्सून धडक देण्यास अनुकूल स्थिती असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

देशातील शेतकऱ्यांसह सर्वच वर्गाचे लक्ष लागून असलेला माॅन्सून अंदमानात दाखल झाला. शुक्रवारी मॉन्सूनने दक्षिण अंदमान समुद्रासह निकोबार बेटांपर्यंत मजल मारली आहे. नियमित वेळेच्या सुमारे पाच दिवस उशिराने अंदमानात आलेल्या मॉन्सूनची वाटचाल काहीशी वेगाने होण्याचे संकेत अाहेत. रविवारी अरबी समुद्राचा काेमोरीन भाग, मालदीव बेटांच्या परिसरात मॉन्सून दाखल होईल.

तर मंगळवारपर्यंत मॉन्सून केरळमधून देशात प्रवेश करण्याची शक्यता आहे.  

‘मेकुणू’ जमिनीवर
अरबी समुद्रात आलेले ‘मेकुणू’ हे अतितीव्र चक्रीवादळ शुक्रवारी मध्यरात्री ओमानच्या किनाऱ्याला धडकले. शनिवारी सकाळी हे चक्रीवादळ जमिनीवर आले असून, त्याची तीव्रता वेगाने कमी होत आहे. शनिवारी रात्री त्याचे रुपांतर कमी दाबाचे क्षेत्रात होईल, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Web Title: monsoon keral