मोशी गायरानातील झाडांना पाणी

मोशी गायरान - येथील झाडांना टॅंकरने पाणी देताना महापालिकेच्या उद्यान विभागाचे कर्मचारी.
मोशी गायरान - येथील झाडांना टॅंकरने पाणी देताना महापालिकेच्या उद्यान विभागाचे कर्मचारी.

पिंपरी - मोशी कचरा डेपो आणि दगड खाणी यादरम्यानच्या गायरान जमिनीवर लावलेली झाडे पाण्याअभावी सुकली आहेत. ही झाडे पालिकेने लावलेली नसल्याचे उद्यान आणि पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले होते. त्यामुळे जळणाऱ्या झाडांना पाणी घालायचे कोणी, असा प्रश्‍न निर्माण झाला होता. याबाबत ‘मी झाडे लावली नाहीत, मी पाणी घालणार नाही’ असे वृत्त गुरुवारी (ता. १७) ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेऊन महापालिकेच्या उद्यान विभागाने टॅंकरद्वारे झाडांना पाणी देण्याची व्यवस्था केली आहे.  

मोशी कचरा डेपोलगत सुमारे २५० एकरांचे गायरान आहे. १९९७ मध्ये मोशीचा समावेश महापालिकेत झाला. त्या वेळी या ठिकाणी सफारी पार्क करण्याचे नियोजन होते. त्यासाठी महापालिकेने वृक्षारोपण केले होते. त्यातील काही झाडे मोठे झाली आहेत. मात्र, या गायरानात दरवर्षी पावसाळ्यात विविध संस्था-संघटनांतर्फे वृक्षारोपण केले जाते. त्यामुळे गायरानातील झाडांची संख्या वाढलेली आहे. ही झाडे साधारणतः दहा फुटांपर्यंत वाढलेली आहेत. मात्र, पाण्याअभावी ती जळत आहेत. या झाडांना पाणी देण्याबाबत विचारले असता, महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी आणि उद्यान अधीक्षक सुरेश साळुंके यांनी एकमेकांकडे अंगुली निर्देश केले होते. याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पर्यावरणप्रेमींनीही झाडांना पाणी घालण्याबाबत आवाज उठवला. त्यामुळे जागे झालेल्या प्रशासनाने टॅंकरने गायरानातील झाडांना पाण्याची व्यवस्था केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com