आई ही "सुपर मॉम'च 

आई ही "सुपर मॉम'च 

पुणे - ""पूर्वीच्या काळी होममेकर अशी आईविषयीची भावना होती. सासू-सासरे, पती, मुलाबाळांचा सांभाळ करणाऱ्या या आईची संकल्पना आजच्या काळात बदलली आहे. सुपर मॉम ही संकल्पना रुजू लागली आहे. ती आई उच्चशिक्षित असावी, ही आजची अपेक्षा आहे; मात्र तिने पवित्र शास्त्र (बायबल) मध्ये दिलेल्या आईबद्दलच्या अपेक्षांचेही पालन करावे,'' असा संदेश वाचून दाखवत होत्या ऍलेस चव्हाण. निमित्त होते "मदर्स डे'चे. 

ख्रिश्‍चन धर्मीय नागरिक दरवर्षी मे महिन्यातील दुसरा रविवार मदर्स डे म्हणून साजरा करतात. मातृ दिनाला इंग्लंडमध्ये मदर्स डे असे म्हणतात. यानिमित्ताने शहर व उपनगरांतील विविध चर्चमध्ये "आई'विषयी प्रवचने झाली. आजच्या दिनाचे औचित्य साधून बहुतांश ख्रिश्‍चन धर्मीयांनी चर्चमध्ये सामूहिक प्रार्थनेत सहभाग घेतला. काही चर्चमध्ये सकाळी, तर काही चर्चमध्ये सायंकाळी प्रवचन झाले. तसेच महिलांचा सत्कारही करण्यात आला. 

कॅम्पमधील सेंट मॅथ्युज मराठी चर्चमध्ये जमलेल्या भाविकांसमोर चव्हाण यांनी आईविषयीच्या संदेशाचे वाचन केले. रेव्हरंड रूपेश शिंदे, ले लिडर सॅम्युअल त्रिभूवन यांनी प्रभूयेशूच्या संदेशाचे वाचन केले. चर्चचे सचिव विनोद नवगिरे, यूथ ग्रुपचे मोझेस गायकवाड उपस्थित होते. प्रभूची गाणीही म्हणण्यात आली. हेच दृश्‍य विविध चर्चमध्येही होते. सेंट मेरी चर्च (खडकी) येथे बिशप शरद गायकवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

गंज पेठेतील इम्यॅन्युअल चर्च येथे परिचारिकांचा सत्कार करण्यात आला, असे रेव्हरंड अनिल इनामदार यांनी सांगितले. सेंट पॉल चर्च (सांगवी), ऑल सेंट मराठी चर्च (खडकी) येथे रेव्हरंड मेधा गायकवाड यांनी आईविषयीचा संदेश दिला. चर्च ऑफ द होली नेम (गुरुवार पेठ) येथेही उत्साहात मदर्स डे साजरा करण्यात आला, असे सहसचिव सुधीर चांदेकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com